सातारा जिल्हा
कु वेदिका येळवे हिचे सारथी परीक्षेत यश
कु वेदिका येळवे हिचे सारथी परीक्षेत यश
रघुनाथ थोरात
सन २०२३-२०२४ मध्ये घेण्यात आलेल्या सारथी शिष्यवृत्ती परीक्षेत(NMMS) श्रीमती रुक्मिणीबाई पांडुरंग कदम कन्या विद्यालय उंब्रज या शाळेची इयत्ता आठवी मध्ये शिकणारी कु वेदिका जगदीश येळवे हिने उज्वल यश संपादन करून रयत शिक्षण संस्थेच्या तसेच विद्यालयाच्या नावलौकिकात भर टाकली आहे.शाळेच्या वतीने तिला प्रमाणपत्र देऊन नुकतेच गौरवण्यात आले असून शाळेतील शिक्षक स्टाफ तसेच कर्मचारी वृंद यांनी कु वेदिका जगदीश येळवे हिचे अभिनंदन केले आहे.