हिंदकेसरी मारुती माने गर्ल्स हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजच्या मुली बावीस वर्षांनंतर पुन्हा एकदा शाळेत
हिंदकेसरी मारुती माने गर्ल्स हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजच्या मुली बावीस वर्षांनंतर पुन्हा एकदा शाळेत
मिरज:- संजय पवार
हिंदकेसरी मारुती माने भाऊ यांनी जुन 1997 मध्ये मुलींची शाळा कवठेपिरान मध्ये सुरू केली . त्या वेळी इयत्ता पाचवी च्या वर्गात प्रवेश घेतलेल्या मुली नैसर्गिक वाढीने सन मार्च 2003 मध्ये इयत्ता 10 वी परिक्षा दिली त्यां नंतर त्या विद्यार्थीनी व शिक्षक तब्बल एकवीस वर्षांनी एकत्र येऊन गेटटुगेदर घेण्यात आले यावेळी प्रत्येकाच्या मनात ऐकमेका विषयी अपुलकी व स्नेह जिव्हाळा दिसून आला.त्यांच्या सर्वांच्या चेहर्यावर उत्साह ओसांडून वाहत होता .
हा स्नेह मेळाव्याला सर्व . विद्यार्थीनी व माहेर वासीनी मुलींनीही पून्हा शाळेचा अनुभव घेतला . कार्यक्रमाची सुरुवात सरस्वता पूजन व दिप प्रज्वलन करून प्रार्थना व राष्ट्र गीत यांने झाली सारिका विष्णू पाटील हिने स्वागत करुन कार्यक्रमाची सुरवात झाली . मनिषा निर्वाने हीने सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी याचे स्वागत केले .सर्व मुलींनी आपला परिचय कुंटुब परीवार यांच्या विषयी माहिती दिली . सर्व विद्यार्थिनी बँचवर बसून जुन्या आठवणी जाग्या करत होत्या . यातील सर्व मुली उत्कृष्ट पत्नी , आदर्श सुन , तसेच आदर्श माता झालेल्या आहेत . काही च्या मुलांनी विविध स्पर्धेत उत्तम यश मिळाले आहे .
पण आज शाळेत असताना त्यांना त्यांच्या कुंटूबाचा पूर्ण विसर पडला होता . प्रत्येक जण लाख रुपये किंमतीची मैत्रीण भेटल्याचे बोलत होते . बावीस वर्षांनंतर भेटत असल्याने सकाळी साडे दहा वाजता आले नंतर सर्व मुली आंनदाने एकमेकीच्या गळ्या भेट घेत होत्या व अभूतपूर्व सुख अनुभवत होत्या. चहा नाश्ता ने सुखात स्वागत परिचय दुपारचे गरमा गरम जेवण चपाती ,श्रीखंड , लोणचे , पनीर चटणी , असा सगळा मेणू सर्वच अभुतपूर्व घटना घडत होत्या . प्रत्येकाचे चेहरे आंनदाने फुललेले होते .
या कार्यक्रमात प्राचार्य सुधाकर माने , प्रकाश कुंभार , शिवाजी पाटील , सूर्यकांत मजलेकर ‘ सौ .यु ए पाटील , शहाजी कापसे , अमर चावरेकर , बबन जाधव , नामदेव जाधव , बसवाण्णा हजेरी शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते .
मुलींनी आपली मनोगते व्यक्त करताना शाळेतील बाकावरच्या , सहलीच्या सगळ्या आठवणी जाग्या केल्या .खेळाचा पाया रोवणारे आमचे खेलाडूप्रिय शिक्षक प्रार्थनेची शिस्त एम,इंग्रजी विषयातील ग्रामर चा पाया भक्कम करणाऱ्या ,मुलींना वेशभुषा, संस्कार ,शिस्त विषयी लक्ष देवून संस्कार करण्यारे शिक्षक यांच्या मुळे आज आम्ही मानाने आमच्या सासर मध्ये एकत्र कुटुंब पद्धतीत आनंदाने जीवन जगत आह.े या मध्ये शाळेत त्या वेळी नको वाढणारी शिस्थ , संस्कार आज आमच्या उपयोगी पडेल अशी भावना मुलीनी व्यक्त केली . हा स्नेह मेळावा आयोजित करण्यात सरिका पाटील , मनिषा निर्वाने , अर्चना पाटील प्रियंका देसाई , जयश्री खाडे , अरुणा निरवाने , वंदना देसाई , रेखा देसाई , वैशाली देसाई , सुजाता माळी , अर्पना पाटील , अश्विनी पाटील , यास्मीन पठाण विनया देसाई , अमृता येवले , पद्मा जाधव , संगीता येवले , सनिता पाटील , अश्विनी चौगुले, अनुराधा आवळे , वनिता माने , सविता देशिंगे , मेघा माळी , दिपाली पाटील रोहीनी देसाई या मुली उपस्थित होत्या . कार्यक्रम सकाळी दहा पासून सांयकाळी सहा पर्यंत सुरू होता कोणताही मुलीला तो दिवस वेळ पुढे जाऊ नये असे वाटत होते . शेवटी बावीस वर्षा पूर्वी च्या सर्व आठवणी सर्वाच्या चेहऱ्यावर दिसत होते . मुलींनी शाळेसाठी भेटवस्तू म्हणूण पंखा दिला . शाळेच्या वतीने सर्व मुलींची खना नारळाने ओटी भरुण कार्यक्रमाची सांगता झाली . रेखा देसाई हिने सर्वांचे मनःपूर्वक आभार मानले व कार्यक्रमाची सांगता झाली .