डी. वाय. पाटील टेक्निकल कॅम्पसच्या प्रा. गुणाली दिवाण यांना पीएच. डी
तळसंदे येथील डी. वाय. पाटील टेक्निकल कॅम्पसच्या प्रा. गुणाली दिनेश दिवाण यांना पुणे येथील भारती अभिमत विद्यापीठाकडून पीएच.डी. जाहीर झाली आहे.
एमबीए विभागप्रमुख म्हणून कार्यरत असलेल्या प्रा. गुणाली दिवाण यांनी “अ स्टडी ऑन इम्पॅक्ट ऑफ ह्यूमन रिसॉर्स प्रॅक्टिसेस ऑन एम्प्लॉयी परफॉर्मन्स इन डिपार्टमेंट ऑफ अग्रीकल्चर गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र ” या विषयावर शोधनिबंध सादर केला होता. त्यांना डॉ. वीरधवल घोरपडे यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच संस्थेच्या कोल्हापूर सेंटरचे हेड डॉ. राजेश कंठे यांचे सहकार्य लाभले.
प्रा. दिवाण यांनी मिळवलेल्या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील, उपाध्यक्ष आमदार सतेज डी. पाटील, विश्वस्त आमदार ऋतुराज पाटील, कार्यकारी संचालक डॉ. ए. के. गुप्ता, टेक्निकल कॅम्पसचे डायरेक्टर प्रा. सतीश पावसकर , रजिस्ट्रार प्रकाश भगाजे यांनी अभिनंदन केले.