राज्यातील महा ई सेवा केंद्र चालकांचे रविवारी राज्यस्तरीय अधिवेशन : वाळवा तालुक्यासह सांगली जिल्ह्यातीलतील केंद्रचालक मोठ्या संख्येने उपस्थित राहणार.
नवे पारगाव वार्ताहर
अखिल स्तरीय महा ई सेवा केंद्र, व आधार सेवा केंद्र यांचे पहीले राज्यस्तरीय पहिले अधिवेशन येत्या रविवारी ८ डिसेंबर रोजी शिर्डी (जिल्हा नगर) येथे संपन्न होत आहे. अखिल स्तरीय महा ई सेवा केंद्र, यांची महाराष्ट्रात संघटना स्थापन झालीअसुन यामध्ये सेवा केंद्रामध्ये येणा-या अडचणी यावर विचार विनिमय व अडचणीचा पाठपुरावा करण्यासाठी सरकार दरबारी मागण्यासाठी संघटना मजबूत करण्याचा प्रयत्न करण्यात येणार असुन भविष्यातील महा ई सेवा केंद्राच्या समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न या अधिवेशनात करण्यात येणार आहेत यामध्ये राज्यातील सर्व केंद्र संचालकांनी स्वयंस्फूर्तीने सहभागी होण्याचे आवाहन संघटनेचे सचिव विनोद तायडे यांनी केले असून वाळवा तालुक्यातून बहुतांश केंद्र चालक यामध्ये महादेव देसाई, संतोष जाधव, प्रदीप रकटे, गणेश कुंभार, संदीप डोंगरे, चंद्रकांत घोरपडे, सागर भांबुरे, मदन पाटील, राजेंद्र शिंदे, विजय पाटील, सोमनाथ लिधडे, शरद पवार, नितीन खोत, विशाल शिंगे, सुनिल पाटील, योगेश जंगम, किरण पडळकर आदी केंद्रचालक उपस्थित राहणार आहेत.
महाराष्ट्र शासनाने महसूलच्या संबंधित विविध प्रकारचे असलेल्या सेवा जनतेला चांगल्या पद्धतीने मिळाल्या पाहिजे यासाठी आधार व सेतू केंद्राची स्थापना केली या माध्यमातून चांगल्या पद्धतीने सेवा करण्याचा प्रयत्न या केंद्रचालकांनी देखील केलेला आहे. संगमनेर येथील नवनिर्वाचित आमदार अमोल खताळ यांनी देखील सेतू व आधारच्या माध्यमातून केंद्र चालून मिळालेल्या जनसंपर्कच्या आधारावर थेट विधानसभेत केलेला प्रवेश हा महाराष्ट्रातील सेतू व आधार केंद्र चालक ऑपरेटर यांच्यासाठी भूषणास्पद अशी बाब ठरलेली आहे. जर चांगल्या पद्धतीने सेवा घडत गेली तर जनता कशाप्रकारे त्याची उतराई करू शकते याचे उदाहरण आमदार अमोल खताळ ठरले आहेत. आधार सेतू केंद्र चालक ऑपरेटर यांच्या विविध अडचणी आहेत. त्या अडचणी अधिवेशनात मांडणार असून या अधिवेशनात सर्व केंद्रचालकांचे विचार मंथन होणार आहे. आता थेट आमदार म्हणूनच एक आधार व सेतू केंद्र चालक महाराष्ट्रात विधानसभेत पोहोचल्यामुळे येणाऱ्या विविध अडचणी लगतच्या भविष्यकाळात निश्चितपणे मार्गी लागतील अशी अपेक्षा सर्व केंद्रचालकांना असून त्यासाठी महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातून आधार व सेतू केंद्र चालक ऑपरेटर भाग घेणार आहेत. या प्रसंगी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन सचिव विनोद तायडे यांनी केले आहे.