डी. वाय. पाटील बी. टेक. अॅग्रीच्या :अनुजची राहुरी विद्यापीठ हॉकी संघात निवड
डी. वाय. पाटील बी. टेक. अॅग्रीच्या :अनुजची राहुरी विद्यापीठ हॉकी संघात निवड
तळसंदे
डॉ. डी. वाय. पाटील बी. टेक अॅग्रीच्या प्रथम वर्षाचा विद्यार्थी अनुज पाटील याची महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरीच्या हॉकी संघात निवड झाली आहे. राजस्थानमधील सुरेश ज्ञान विहार युनिव्हर्सिटी जयपुर येथे पार पडलेल्या पश्चिम विभागीय अंतर विद्यापीठ स्पर्धेमध्ये उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत विद्यापीठाचे प्रतिनिधित्व केले.
या निवडीसाठी क्रीडा संचालक प्रा. ए. एस. बंद्रे यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. बी. पाटील, अकॅडमीक इन्चार्ज. पी. डी. उके विद्यार्थी कल्याण अधिकारी ए. बी. गाताडे यांचे प्रोत्साहन लाभले.
संस्थेचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील, उपाध्यक्ष आमदार सतेज डी. पाटील, विश्वस्त आमदार ऋतुराज पाटील, आणि कार्यकारी संचालक डॉ. ए. के. गुप्ता यांनी अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या.