महाराष्ट्र पक्षीमित्र तर्फे पक्षी सप्ताहानिमित्ताने चावराई माध्यमिक विद्यालयात विविध उपक्रम
महाराष्ट्र पक्षीमित्र तर्फे पक्षी सप्ताहानिमित्ताने चावराई माध्यमिक विद्यालयात विविध उपक्रम
पानकावळा, खंड्या, गप्पीदास, पाँड हेरोन पक्षांसह १६ पक्षांचे दर्शनविद्यार्थी-विनवे पारगाव , ता. ५: चावरे (ता. हातकणंगले) येथील चावराई माध्यमिक विद्यालयात पक्षी सप्ताह विविध स्पर्धा, पक्षी निरीक्षण उपक्रम मोठ्या उत्साहात पार पडले.
चावरे येथील वाईल्ड लाईफ कॉन्सर्व्हेशन अँण्ड रिसर्च फौंडेशन व महाराष्ट्र पक्षीमित्र तर्फे पक्षी सप्ताहानिमित्ताने चावराई माध्यमिक विद्यालयात चित्रकला स्पर्धा, निबंध स्पर्धा पार पडल्या.
पक्ष्यांचे निसर्गातील स्थान, माझ्या परिसरातील पक्षी -जीवन,पक्षी आणि अंधश्रद्धा, पक्षी : शेतकऱ्यांचे मित्र, माझा छंद – पक्षीनिरीक्षण, माझी पक्षी अभयारण्याला भेट, सह्याद्रीतील पक्षीजीवन, महाराष्ट्राचा राज्यपक्षी या विषयावर चित्रकला स्पर्धा झाल्या. पिसारा फुलवून नाचणारा मोर, माझा आवडता पक्षी, घरटे विणणारी सुगरण (पक्षी), मासा पकडण्यासाठी ध्यान लावून पाण्यात उभारलेला बगळा, घर चिमणी ( नर- मादी जोडी), पक्षीतज्ञ डॉ. सलीम अली, पक्षी निरीक्षण करणारी मुले या विषयी निबंध स्पर्धा पार पडली.
जुने चावरे येथील वारणा नदी परिसरात महारष्ट्र पक्षिमित्र संघटनेचे सदस्य युवराज पाटील यांनी चावरे येथील वारणा नदी किनारी पक्षिनिरिक्षण उपक्रम घेत विद्यार्थ्याना पक्ष्यांचे निरीक्षण कसे करावे? पक्षांच्या खाद्य सवयी, वेगवेगळ्या अधिवासातील पक्ष्यांचे आढळणारे प्रकार व त्यांची विविधता, पक्षी स्थलांतर का करतात? पक्ष्यांची प्रजाती याविषयी सविस्तर महिती दिली. पक्षिनिरिक्षणत १६ प्रकारचें पक्षी आढळले. स्थानिक पक्ष्यांच्यामध्ये सामान्य गप्पीदास, माळटिटवी, वेडा राघू, लहान बगळा, करडा धोबी, पांढरा धोबी, नदीसुरय , काळा अवाक, कोतवाल, खाटीक, सातभाई, लहान खंड्या, मोठा खंड्या, ग्रे हेरॉन, पाँड् हेरॉन, पान कावळा आदी पक्षी दुर्बिणद्वारे पाहायला मिळाल्याने विद्यार्थ्यांतून समाधानाच्या प्रतिक्रिया व्यक्त झाल्या.
यावेळी विद्यालयाचे मुख्याध्यापक एस. एस. पाटील, एस. व्ही. वळगड्डे, एस. ए. पाटील, सी. एस. पाटील, एन व्हीं बिडकर, जे. एस. कुंभार, एम. एस. धोंगडे, ए. वाय. पाटील, डी ए .पाटील उपस्थित होते.
पक्षीनिरीक्षणादरम्यान पाण्यामध्ये पान कावळ्याने बराच वेळ पाण्यामध्ये बुडी मारत केलेली माशाची शिकार व छोटा खंड्याने पाण्यात केलेली शिकार पाहून विद्यार्थ्यानी आनंदोत्सव साजरा केला.
—–
स्पर्धेचा निकाल असा–निबंध स्पर्धेचा निकाल
:- प्रथम क्रमांक रिया सुरेश पाटील
द्वितीय क्रमांक – भक्ती रामचंद्र पाटील, तृतीय क्रमांक – पूर्वा शरद निकम, उत्तेजनार्थ – श्रावणी दीपक कोरे
चित्रकला स्पर्धेचा निकाल – प्रथम क्रमांक पूर्वा आनंदराव पाटील
द्वितीय क्रमांक – सानिया संजय सिद, तृतीय क्रमांक – अदिती दत्तात्रय निकम, उत्तेजनार्थ – वैष्णवी सागर धनवडे