संतोष बेनाडे यांना मानत डॉक्टरेट पदवी प्रदान
हेसन आंतरराष्ट्रीय विद्यापीठ जर्मनी ने सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल संतोष बेनाडे यांना मानत डॉक्टरेट देऊन सन्मानित केले.
पत्रकार: सुभाष भोसले
कोल्हापुरातील युवा उद्योजक संतोष शशिकांत बेनाडे उद्योगाबरोबर समाजसेवेची आवड म्हणून समाजातील अनेक गोरगरीब व निराधार लोकांना निस्वार्थपणे सेवा बजावत असतात. कोविड सारख्या महाभयंकर महामारीच्या वेळी केलेले कार्य, कोल्हापूर व सांगली येथे नैसर्गिक आपत्ती महापूर वेळी केलेली जनसेवा तसेच प्रत्येक वर्षी सामाजिक बांधिलकी म्हणून, गोरगरिबांना केलेली मदत याबद्दल मिळालेले अनेक स्तरावरील पुरस्कार, दैनिक न्युज पेपर मध्ये आलेल्या अनेक बातम्या, अशा सर्व गोष्टींचा आढावा घेऊन, जर्मनी येथील हेसन इंटरनॅशनल युनिव्हर्सिटीने संतोष बेनाडे यांना सामाजिक क्षेत्रातील मानत डॉक्टरेट पदवी प्रधान केली.
मानद डॉक्टरेट पदवी समारंभ गोवा येथील कला सांस्कृतिक भवन पाटो-पणजी येथे, भारत बटालियन चे सहाय्यक कमांडंट (Dy.Sp) सदानंद सदाशिव व डॉ. राजेंद्र ननवरे यांच्या हस्ते संतोष बेनाडे यांना देऊन सन्मानित करण्यात आले. हे जनसमुदायात कळता क्षणीच डॉ बेनाडे यांना अनेक स्तरावरून कौतुक व शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.