सानिया मिर्झाची पोस्ट वाचून तुमच्याही डोळ्यात येईल पाणी, “मुलासाठी तुम्ही..”
शोएब मलिक आणि सानिया मिर्झा यांचा घटस्फोट झाला आहे. शोएबने अभिनेत्री सना खानशी निकाह झाल्याचे फोटो पोस्ट केले आणि एकच खळबळ उडाली होती. तेव्हापासूनच सानिया मिर्झा चर्चेत आहे. सानियाने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर एक पोस्ट लिहिली आह. जी पोस्ट चांगलीच चर्चेत आहे. शोएब मलिकशी ‘खुला’ (घटस्फोट) झाल्यानंतर सानिया मिर्झा आता एकटी झाली आहे. आता सानिया मिर्झाची पोस्ट कुणालाही भावूक करेल अशीच आहे.
सानिया आणि शोएबचं लग्न २०१० मध्ये झालं होतं
४१ वर्षीय शोएब आणि सानिया मिर्झाचं २०१० साली लग्न झालं होतं. हे शोएबचं दुसरं लग्न होतं. त्याआधी शोएब आणि आयेशा सिद्दीकी यांचा घटस्फोट झाला होता. सानिया आणि सोहराब मिर्झा यांचा साखरपुडा झाला पण लग्न झालं नव्हतं. पाकिस्तानच्या खेळाडूशी लग्न करण्यावरून सानिया मिर्झाला प्रचंड ट्रोल करण्यात आलं होतं. लग्नानंतर सानिया-शोएब दुबईत राहत होते. ४१वर्षीय शोएब हा पाकिस्तानचा माजी कर्णधार असून ३५ कसोटी, २८७ एकदिवसीय आणि १२४ ट्वेन्टी२० सामन्यात त्याने पाकिस्तानचं प्रतिनिधित्व केलं आहे. जगभरात विविध ट्वेन्टी२० लीगमध्ये दहाहून अधिक संघांसाठी तो नियमित खेळतो.