शनिवारची शाळा सकाळ सत्रात ७:३० वाजता भरवण्याबाबत :शिक्षक भारती संघटनेचा पाठपुरावा
शनिवारची शाळा सकाळ सत्रात ७:३० वाजता भरवण्याबाबत
शिक्षक भारती संघटनेचा पाठपुरावा
मिरज:- संजय पवार
बहुतांशी जिल्ह्यात शनिवारी जिल्हा परिषद शाळा सकाळी 9:00 नंतर भरत आहेत.जिल्हा परिषद शाळा आठवड्यातून फक्त शनिवारी 1 दिवस सकाळी भरतात.आनंददायी शनिवार,सामुदायीक कवायत असे उपक्रम राबविताना शनिवारी सकाळी 9:00 ची वेळ गैरसोयीची ठरत आहे.शनिवारी जि.प.शाळा सकाळी 7:30ते 11:30 अशी भरविण्यात यावी.ही मागणी 3 सप्टेंबर 2024 रोजी मंत्रालयात एस डी 4 विभागाचे अवर सचिव विजय कुलकर्णी साहेब,वसुदेव कराड यांचेकडे रोजी शिक्षक भारती जिल्हा सरचिटणीस कृष्णा पोळ ,दिगंबर सावंत,चंद्रकांत कांबळे,अस्लम शेख यांनी केली.फेब्रुवारी 2024 मधील शासन निर्णयानुसार जिल्हा परिषदेच्या 1ली ते 4 थी च्या शाळा सकाळी 9:00 नंतर भरविण्यात याव्यात असे नमुद केले आहे.त्यामुळे बहुतांशी जिल्ह्यात जिल्हा परिषद शाळा सकाळी 9:00 नंतर भरत आहेत.यामुळे आनंददायी शनिवार यासारखे उपक्रम राबविण्यास सदरची वेळ गैरसोयीची होत आहे.तसेच एकाच गावात माध्यमिक शाळा सकाळी 7:30 वाजता भरत आहेत अन् जिल्हा परिषदेची शाळा सकाळी 9:00 नंतर भरत आहे.त्यामुळे पालकांना मुलांना शाळेत सोडणे,शाळा सुटल्यानंतर घेऊन जाणे गैरसोयीचे होत आहे.याबाबी मंत्रालयात शालेय शिक्षण विभाग एस डी 4 मध्ये अवर सचिव कुलकर्णी साहेब यांना सांगितल्या.त्यावेळी त्यांनी सांगितले की 8 फेब्रुवारी 2024 च्या पत्रात स्थानिक पातळीवर शाळेची वेळ ठरविण्याबाबत शिक्षणाधिकारी यांना स्वतंत्र निर्णय घेण्यास लवचिकता दिली आहे.असे सांगितले होते.तरीही याबाबत शिक्षक भारती संघटनेच्या मागणीनुसार मंत्रालयातून जिल्हा परिषद शाळा शनिवारी सकाळी 9पुर्वी घेण्या संदर्भात शिक्षण संचालक यांना अवरसचिव विजय कुलकर्णी यांनी कळविले.यामुळे शनिवारची शाळा प्रत्येक जिल्ह्यात पुर्वी प्रमाणे सकाळी 7:30 वाजता भरण्याचा प्रश्न सुटला आहे.