तालुका हातकणंगले वार्ता
भादोले हायस्कूल भादोले मध्ये टाटा बिल्डिंग इंडिया निबंध स्पर्धा उत्साहात
भादोले हायस्कूल भादोले या विद्यालयात टाटा बिल्डिंग इंडिया निबंध स्पर्धेतील विजेत्यांना गौरविण्यात आले.
पेठवडगाव :ता.१७ भादोले हायस्कूल भादोले या विद्यालयात टाटा समूह आयोजित टाटा बिल्डिंग इंडिया निबंध स्पर्धा २०२४/२५ उत्साहात संपन्न झाल्या या स्पर्धा दोन गटात झाल्या मोठा गट आठवी ते दहावी व लहान गट पाचवी ते सातवी यामध्ये निबंधाचा विषय होता ‘ स्मार्ट इंडिया निर्माण करण्यात युवा पिढीची भूमिका’ या स्पर्धेत निकाल पुढीलप्रमाणे
मोठ्या गटात
प्रथम समीक्षा सुरज अवघडे
द्वितीय मृणाली रमण धनवडे
तृतीय सान्वी दिनकर अवघडे
लहान गटांमध्ये
प्रथम आदर्श आण्णा सावंत
द्वितीय शिवानी दिपक पवार
तृतीय असावरी दयानंद कुरणे
हे विद्यार्थी विजेते ठरले. या विजेत्यांना शाळेचे मुख्याध्यापक श्री नांगरे आर बी व टाटा आयऑपरेशनचे प्रतिनिधी सुहास थोरवत यांच्या हस्ते मेडल व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले यावेळी ग्रामपंचायत सदस्य राहुल पाटील व शिक्षक शिक्षेतर कर्मचारी उपस्थित होते.