ऑस्ट्रेलियाचं सेलिब्रेशन पंचांनी थांबवलं; बाद असूनही ‘त्याला’ घोषित केलं नाबाद, क्रिकेटचा हा नियम काय सांगतो?
AUS vs WI T20I Weird Not Out: ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेट संघासाठी कालचा दिवस अत्यंत खास ठरला. भारताच्या वरिष्ठ संघाप्रमाणेच काल युवा संघाला देखील शेवटच्या टप्प्यात येऊन ऑस्ट्रेलियाच्या विरुद्ध सामन्यात विश्वचषक गमवावा लागला.
AUS vs WI T20I Weird Not Out: ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेट संघासाठी कालचा दिवस अत्यंत खास ठरला. भारताच्या वरिष्ठ संघाप्रमाणेच काल युवा संघाला देखील शेवटच्या टप्प्यात येऊन ऑस्ट्रेलियाच्या विरुद्ध सामन्यात विश्वचषक गमवावा लागला. एकीकडे ऑस्ट्रेलियाच्या अंडर १९ संघाचा विश्वचषकातील विजय तर दुसरीकडे ऑस्ट्रेलियाच्या वरिष्ठ संघाने सुद्धा वेस्ट इंडिजविरुद्ध काल सलग दुसरा विजय मिळवला. ग्लेन मॅक्सवेलच्या कारकिर्दीतील विक्रमी पाचव्या शतकाच्या जोरावर (१२०) ऑस्ट्रेलियाने तीन सामन्यांच्या T20I स्पर्धेत ३४ धावांच्या फरकाने २-० अशी अभेद्य आघाडी घेतली. या मोठ्या विजयाच्या सेलिब्रेशनआधीचा एक प्रसंग मात्र चकित करणारा व तितकाच हास्यास्पद ठरला.
बाद तरी नाबाद कारण..
वेस्ट इंडिजच्या आव्हानाचा पाठलाग करण्याच्या शेवटच्या षटकात अल्झारी जोसेफने, स्पेन्सर जॉन्सनचा दुसरा चेंडू कव्हरकडे वळवला. कर्णधार मिचेल मार्शने शांतपणे चेंडू झेलून लगेच गोलंदाजाकडे टाकला. चपळाईने जॉन्सनने जोसेफ क्रिझमध्ये येण्यापूर्वीच त्याला धावबाद केले. अत्यंत स्पष्टपणे जोसेफ बाद झाल्याने मार्श आणि जॉन्सनसह ऑस्ट्रेलियाचा संघ आनंद साजरा करू लागला पण तितक्यात पंचांनी हे सेलिब्रेशन थांबवण्यासाठी मध्यस्थी केली. इथे पंचांनी चक्क जोसेफ नाबाद असल्याचे सांगितले, आणि यासाठी दिलेलं कारण सध्या चर्चेत आलं आहे.