आम्हाला आमचं शाश्वत जगणं मिळायला हवं..
शाश्वत जगणं
मतदारांना जेवणावळी नको..
तर शाश्वत विकास हवा…
रोजच्या पोटासाठी घासातला घास हवा..
वर्षानुवर्षे तुम्ही हेच करता..
निवडणुका आल्या की दारात येता..
आमच्या फाटक्या चटईवर काय बसता..
फुटक्या बशीतला काळा चहा तुम्ही पिता..
निवडणुकीवेळी तुमच्यातील माणुसकी उफाळून येते..
निवडून द्या मला तुझ्या पोराले नोकरी मी देते…
आश्वासन देऊन तुम्ही निघून जाता..
अनं मग मात्र मागे कधीच वळून न पाहता..
शेजारी उभं असलेलं शेंबडं पोरगंही तुम्हाला तुमचं वाटतं..
बापासारखं आयुष्यभर पाठीशी झेंडा घेऊन उभं रहावं एवढंच सांगणं असतं..
प्रचारात तुमच्या पायाला भिंगरी असते. ..
एखादी छोटीशी झोपडीही तुमच्यानं सुटत नसते..
मताचा जोगवा मागता दारोदार. .
आश्वासनांची खैरात करता भारोभार..
परंतु,आता हे कुठेतरी थांबायला हवं..
आम्हाला आमचं शाश्वत जगणं मिळायला हवं…
आम्हाला आमचं शाश्वत जगणं मिळायला हवं. ..
मार्मिक
लेखन
सौ स्नेहा पाटील-थोरात
एम ए (मराठी)
कळंत्रेवाडी,ता.कराड