कळंत्रेवाडीत मनोज घोरपडेंच्या विजयाचा जल्लोष
गुलालाची उधळण,फटाक्यांची आतिषबाजी
रघुनाथ थोरात
कराड उत्तर विधानसभा मतदारसंघातील भाजप महायुतीचे उमेदवार मनोज दादा घोरपडे यांनी सलग पाच टर्म आमदार असलेले राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट महाविकास आघाडीचे उमेदवार बाळासाहेब पाटील यांचा तब्बल ४३ हजार ६९१ मतांनी पराभव करीत दणदणीत विजय मिळवला.
त्या पार्श्वभूमीवर कळंत्रेवाडी,ता.कराड येथील भाजप महायुतीचे कार्यकर्ते तसेच मनोज दादा घोरपडे प्रेमींनी विजयाचा जल्लोष साजरा केला. शनिवारी दुपारपर्यंत आमदार मनोज दादा घोरपडे यांच्या विजयाचा मार्ग सुकर झाल्याचे लक्षात आल्यानंतर येथील कार्यकर्ते एकत्र जमले. त्यानंतर म्हसोबा लक्ष्मी या ग्रामदैवताच्या मंदिरात जेष्ठ कार्यकर्ते भिमराव थोरात यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून विजयोत्सव साजरा करण्यात आला. गुलालाची उधळण करीत लक्ष्मीच्या नावानं चांगभलं, म्हसोबाच्या नावानं चांगभलं जयघोषाने कार्यकर्त्यांनी परिसर दणाणून सोडला. त्यानंतर ग्रामदैवतांच्या मंदिरासमोर,दत्तात्रय थोरात,मच्छिंद्र थोरात,अरुण बाकले, सचिन थोरात यांच्या घरासमोर गुलालाची उधळण करत फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली. खरंतर मतदारसंघात कांटे की टक्कर होईल असं वाटत होतं.परंतु भाजप महायुतीची गावागावातील प्रभावी प्रचार यंत्रणा,योग्य नियोजन यामुळे आमदार मनोज दादा घोरपडे यांचा विजयाचा राजमार्ग सुकर झाला. तसेच लाडकी बहीण योजनेमुळे संपूर्ण महिला वर्ग खंबीरपणे मनोज दादा घोरपडे यांच्या पाठीशी उभा राहिल्याचे चित्र दिसून आले. या सर्व बाबींचा सकारात्मक परिणाम मतदानावर झाला. त्यामुळे अखेर पंचवीस वर्षानंतर भाजप महायुतीचे उमेदवार आमदार मनोज दादा घोरपडे यांनी आमदारकी खेचून आणल्याच्या प्रतिक्रिया यावेळी कार्यकर्त्यांनी व्यक्त केल्या.यावेळी ज्येष्ठ कार्यकर्ते भिमराव थोरात,भाजपचे बुथ प्रमुख उपसरपंच दिलीप यादव,दत्तात्रय थोरात,मच्छिंद्र थोरात,अनिल थोरात, राजेंद्र थोरात,अरुण बाकले,प्रवीण थोरात,सचिन थोरात,चंद्रकांत घार्गे आदि उपस्थित होते.