सातारा जिल्हा
कळंत्रेवाडीतील धोकादायक पोल २४ तासाच बदलला
उंब्रज महावितरणची कार्यतत्परता
उंब्रज विभाग प्रतिनिधी/रघुनाथ थोरात
कळंत्रेवाडी,ता.कराड येथील वार्ड क्रमांक एक मध्ये ग्रामपंचायत कार्यालयात शेजारील रस्त्यालगत असलेल्या महावितरणच्या विद्युत खांबाला ट्रॅक्टरची धडक लागल्याने खांबाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. त्यामुळे संपूर्ण गावातील बत्ती गुल झाली होती. रात्रभर गाव अंधारातच होते.दरम्यान,याबाबतची माहिती मिळताच उंब्रज महावितरणच्या उपकार्यकारी अभियंता विद्या जाधव मॅडम तसेच शाखाधिकारी काकडे साहेब यांनी तात्काळ सूत्रे हलवत संबंधित ठेकेदारास धोकादायक पोल हटवण्यासंदर्भात सूचना केल्या अनं २४ तासातच सदरचा धोकादायक बनलेला विद्युत पोल तात्काळ बदलून त्या जागी नवीन पोल उभारण्यात आला.सुदैवाने सदरच्या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नव्हती. उंब्रज महावितरणच्या कार्यतत्परतेचे कौतुक नागरिकांमधून होत आहे.