डी. वाय. पाटील कृषीच्या रोहित पाटीलला आंतर महाविद्यालयीन अॅथलेटिकमध्ये गोल्ड
गोल्ड मेडल मिळवणाऱ्या रोहित पाटीलचा सत्कार करताना प्राचार्य प्रा. डी. एन. शेलार. समेव प्राध्यापक व कर्मचारी वर्ग.
नवे पारगव: वार्ताहर
महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी येथे संपन्न झालेल्या आंतर महाविद्यालयीन अॅथलेटिक स्पर्धेत डी. वाय. पाटील कृषी महाविद्यालय तळसंदेच्या रोहित पाटीलने गोळा फेकमध्ये गोल्ड मेडल प्राप्त केले. या स्पर्धेतील चमकदार कामगिरीमुळे विद्यापीठ संघात त्याने स्थान मिळवले आहे.
या स्पर्धेमध्ये महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी अंतर्गत येणाऱ्या 10 जिल्ह्यांमधील 25 महाविद्यालयांच्या संघांनी सहभाग घेतला होता. डी. वाय. पाटील कृषीच्या रोहित पाटील याने स्पर्धेमध्ये 10.3 मिटर गोळा फेक करून सुवर्ण पदक प्राप्त केले. या कामगिरीमुळे 26 व्या महाराष्ट्र राज्य क्रीडा महोत्सव स्पर्धेत महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या संघामध्ये आपले स्थान निश्चित केले आहे.
या यशाबद्दल प्राचार्य प्रा. डी. एन. शेलार यांनी महाविद्यालयाच्यावतीने रोहितचा सत्कार करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. प्राचार्य प्रा. डी. एन. शेलार, अकॅडमीक इन्चार्ज प्रा. आर. आर. पाटील तसेच विद्यार्थी कल्याण अधिकारी प्रा. ए. बी. गाताडे, प्रशिक्षक प्रा. ए. एस. बंद्रे यांचे मार्गदर्शन व प्रोत्साहन लाभले.
संस्थेचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील, उपाध्यक्ष आ. सतेज पाटील, विश्वस्त ऋतुराज पाटील, कार्यकारी संचालक डॉ. ए. के. गुप्ता यांनी यशस्वी खेळाडूचे व यांचे अभिनंदन केले आहे.