रुकडीतील गावकऱ्यांचा विश्वास विजयी गुलाल हा धैर्यशील माने यांनाच लागणार
रुकडीतील गावकऱ्यांचा विश्वास विजयी गुलाल हा धैर्यशील माने यांनाच लागणार
हातकलंगले लोकसभा मतदारसंघातील पुन्हा एकदा खासदार धैर्यशील माने हेच होणार
जवळपास 21 हजारच्या लीडने खासदार धैर्यशील माने विजयी होतील
रुकडी ता. ३ : येथील गावकऱ्यांना पूर्णपणे विश्वास आहे की हातकलंगले लोकसभा मतदारसंघातील पुन्हा एकदा खासदार धैर्यशील माने हेच होणार. माने घराण्याचे हातकलंगले मतदारसंघात वर्चस्व कायम आहे.१९७७ पासून पाच वेळा कै. बाळासाहेब माने, दोन वेळा निवेदिता माने तर एक वेळा धैर्यशील माने खासदार झाल्या आहेत. लोकनेते खासदार कै. बाळासाहेब माने यांच्यापासून माजी खासदार डॉ. निवेदिता माने ते खासदार धैर्यशील माने या तीन पिढ्यांपासून हातकणंगले मतदारसंघात माने गटाची सत्ता प्रस्थापित केली. ज्या पद्धतीने लोकनेते कै. बाळासाहेब माने यांनी तळागाळातून आपल्या व्यक्तिमत्त्वाची ओळख निर्माण केली.त्याच पद्धतीने धैर्यशील माने यांनी देखील आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. धैर्यशील माने यांनी देखील २००२ पासून ग्रामपंचायत सदस्य पासून सरपंच ,पंचायत समिती सभापती, जिल्हा परिषद ते खासदार पदापर्यंत पोहोचत असताना मतदार संघातील सामान्य जनतेच्या अडचणी व त्यावर आवश्यक असणाऱ्या उपायोजना अतिशय अभ्यासपूर्वक मांडून त्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न केला आहे.जरी मतदारसंघांमध्ये चौरंगी लढत होत असली तर गुलाल हा धैर्यशील माने यांनाच लागणार असल्याचा विश्वास गावकऱ्यांनी व्यक्त केला आहे.
एक अभ्यासू युवा नेतृत्व मतदार संघाचा समस्या लोकसभेत मांडणारे नेतृत्व केंद्र सरकार कडून मतदार संघासाठी मोठा निधी आणला राजकारणापेक्षा नेहमी समाजकारण करणारे दादा पुन्हा खासदार होणार यात शंका नाही.
संभाजी भोसले (सर)
सर्वसामान्य तरुणांना नेतृत्वाची संधी देणारे तरुणांच्या अपेक्षा व अडचणी सोडवण्यासाठी सदैव तत्पर असणारे तरुण तडफदार नेतृत्व म्हणून खासदार माने आहेत.
सचिन इंगळे
रुकडी (शिंदे गट )शिवसेना शहराध्यक्ष
धैर्यशील माने पुन्हा खासदार होणार यात कोणतीही शंकाच नाही कारण मागील पाच वर्षामधील फक्त दोन वर्ष मतदार संघातील जास्तत जास्त गावाना ८ हजार दोनशे कोटी रुपयांचा निधी दिला आहे.
राहुल माने
ग्रामपंचायत सदस्य
गेल्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये प्रचंड मताधिक्याने धैर्यशील माने हे खासदार झाले त्यानंतर त्यांनी पाच वर्षांमध्ये आठ हजार दोनशे कोटीचा विकास कामाचा डोंगर मतदार संघामध्ये रचला आणि प्रत्येक ग्रामीण भागातील खेड्या मध्ये विकास कामांची गंगा सहा तालुक्यांमध्ये नेण्याचे प्रामाणिकपणे काम खा धैर्यशील माने यांनी केलेले आहे त्यामुळे खा धैर्यशील माने हे पुन्हा दुसऱ्यांदा लोकसभेमध्ये चांगल्या मताधिक्याने निवडून येतील हा आत्मविश्वास माझा सारख्या कार्यकर्तेला वाटतो
प्र सरपंच श्री शितल आदिनाथ खोत, ग्रामपंचायत रुकडी
एक तरुण, अभ्यासू व मतदार संघाचा चौफेर अभ्यास असणार नेतृत्व म्हणजे धैर्यशील माने दादा धैर्यशील दादांना तरुणांचे प्रश्न असतील महिलांचे प्रश्न उद्योजकांच्या प्रश्न शेतकऱ्यांचे प्रश्न ग्रामीण भागाचे प्रश्न शहरी भागाचे प्रश्न मराठी ,हिंदी ,इंग्रजी या तिन्ही भाषेंवरचे प्रभुत्व असणारे नेतृत्व संसदेत नक्कीच जाणार
शमुवेल लोखंडे मा उपसरपंच व विद्यमान ग्रामपंचायत सदस्य रूकडी
सामाजिक सलोखा प्रस्थापित करण्यासाठी सदैव धडपड करणारे नेतृत्व, जाती जातीमध्ये, समाजामध्ये होणारे तंटे सोडवण्यासाठी त्यांनी नेहमीच पुढाकार घेतला आहे.
काशिनाथ शिनगारे
धनगर समाज अध्यक्ष रूकडी
जातीय राजकारणापेक्षा समाजकारणाला महत्व देणारा नेता समाजातील विविध जाती धर्मातील लोकांना सहकार्य केले.
विनोद पाटील
एक युवा खासदार 5 वर्षात काय करू शकतो ते खासदार धैर्यशील दादा यांनी करून दाखवला आहे. खासदार हा एक विषयापुरता मर्यादित नसतो तो संपूर्ण घटकांना घेऊन जायचा असतो ते आता प्रतक्षात दादा कडून झाले आहे. पहिल्यांदाच इतिहासात प्रत्येक गावात निधी खासदार यांनी दिला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा धैर्यशील दादा खासदार होणार यात आम्हाला शंका नाही…..
साहिल रफिक कलावंत
“मतदारांच्या विश्वासावरच धैर्यशील माने पुन्हा खासदार होणार”
उच्चशिक्षित,अभ्यासू, तरूण आणि दूरदृष्टी असणारं उमदं नेतृक्व म्हणजे धैर्यशील माने.
मतदारसंघाची गरज ओळखून,विविध योजना आखून त्याकामी भरघोस निधी आणला आहेच शिवाय उर्वरित विकास कामांसाठी मानेच खासदार होणे गरजेचे आहे हे ओळखून मतदारच धैर्यशील मानेंना खासदार करतील.सामान्य जनतेच्या पाठबळावरच खासदार होतील असा विश्वास वाटतो.
संजय वारके.
धैर्यशील दादा निश्चित च खासदार होणार यात शंका नाही. कारण आम्ही विकास कामाच्या जोरावर मतदान मागितलं आहे.राज्यात उच्चांक निधी या मतदारसंघात आणून तो गावा गावात दिला आहे.दादा च्या कामाबद्दल जनता समाधानी आहे.
अमित रणनवरे रुकडी
जवळपास 51 हजारच्या लीडने खासदार धैर्यशील माने विजयी होतील आणि विजय गुलाल हा खासदार धैर्यशील माने यांनाच लागेल
अनिल बागडी पाटील