भिमरत्न तरुण मंडळ मुंजवडी यांच्या वतीने इयत्ता दहावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार
भिमरत्न तरुण मंडळ मुंजवडी यांच्या वतीने इयत्ता दहावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार
पुणे जिल्हा प्रतिनिधी सदाशिव रणदिवे
भिमरत्न तरुण मंडळ मुंजवडी यांच्या वतीने श्रीराम खोलेश्वर माध्यमिक विद्यालय मुंजवडी शाळेतील उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा तसेच प्रथम क्रमांक चि. सविनय भिमसेन रणदिवे 91.20% द्वितीय क्रमांक चि. दत्तात्रय भागचंद येडे 87.80% व तृतीय क्रमांक कु. अंजली अनिल माळवे 84.80% गुण मिळवून यश संपादन केले व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचाही मान्यवरांच्या हस्ते वही पेन हार श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला प्रथम विद्यार्थ्यांच्या हस्ते महापुरुषांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले मा.प्राचार्य श्री दादासाहेब चोरमले सर, प्राचार्य श्री भापकर सर,येळे सर, निंबाळकर सर,नाळे सर, ढवळे मॅडम यांचेही अभिनंदन करण्यात आले व सर्व विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी मुंजवडी गावचे तंटामुक्ती अध्यक्ष श्री सचिन वाघमोडे, मा.सरपंच श्री हणमंत आटोळे,मा.उपसरपंच श्री दादासाहेब ठणके, मा.ग्रा.सदस्य आयु.भिमसेन रणदिवे, मा.उपसरपंच आयु.सुभाष झेंडे, अनिल माळवे,सुधीर कर्वे, तुळशिराम रणदिवे,दादा रणदिवे,शरद झेंडे,अनिल रणदिवे, कैलास रणदिवे,ओम रणदिवे तसेच सर्व श्रामणेर भिमसैनिक उपस्थित होते यावेळी सत्कारमूर्तीनी आपले मनोगत व्यक्त केले प्रास्ताविक गंगाराम रणदिवे यांनी केले