निस्वार्थी समाजसेवकाचा गौरव
: सुनिल भारमल पोलीस उपनिरीक्षक श्रीनिवास पवार यांच्या हस्ते पुरस्कार स्वीकारताना सोबत पै. अमृतमामा भोसले
निस्वार्थी समाजसेवकाचा गौरव
रुकडी ता. २ :येथील राघोबा पाटील तालीम मंडळाचे अध्यक्ष सुनील मारुती भारमल या निस्वार्थी समाजसेवकाचा राज्यस्तरीय पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.पै. ग्रुप महाराष्ट्र राज्य व पै. सुभाष दादा पाटील युथ फाऊंडेशन मार्फत सामाजिक क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल पोलीस उपनिरीक्षक कोल्हापूर श्रीनिवास पवार यांच्या हस्ते राज्यस्तरीय महाराष्ट्र भूषण 2024 हा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.
राघोबा तालीम ही पूर्वीपासूनच मल्ल घडवण्यासाठी उल्लेखनीय कामगिरी करत आहे.अध्यक्ष सुनील भारमल यांच्या कारकीर्द देखील तालमी मार्फत या क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी केली तसेच गावातील रेल्वे प्रवाशांच्या विविध समस्या,भुयारी मार्ग प्रश्न, रुकडी-गांधीनगर नदीवरील पुल प्रश्न,उड्डाणपूल प्रश्न अशा विविध सामाजिक प्रश्न संदर्भात त्यांनी निस्वार्थपणे आंदोलन केली आहेत. तसेच कोरोना कालावधीमध्ये त्यांनी महत्वपूर्ण भूमिका बजावल्यामुळे अनेक कोरोनाग्रस्त व्यक्तींना जीवदान मिळाले तसेच वृक्षारोपण, रक्तदान शिबिर असे विविध सामाजिक उपक्रम राबवण्यासाठी त्यांनी अग्रेसर भूमिका घेतली आहे . या सामाजिक कार्याची दखल घेऊन त्यांचा राज्यस्तरीय पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.
यावेळी उपमहाराष्ट्र केसरी भाजपा शहराध्यक्ष इचलकरंजी पै.अमृतमामा भोसले,पोलीस उपनिरीक्षक कोल्हापूर श्रीनिवास पवार, अभिजीत तापेकर, सौरव पाटील, डॉ. सुनील अग्रवाल ,नजरुद्दीन नायकवडी आदी मान्यवर उपस्थित होते.