ताज्या बातम्या

पुढील २ दिवस राज्यात पावसाची शक्यता

पुढील २ दिवस राज्यात पावसाची शक्यता

 

तर ७-८ जून २०२४ ला मान्सून तळकोकणात दाखल होणार

पंडित, श्री, उमेश सुतार यांच्याकडून

नुकताच मान्सून केरळमध्ये दाखल झाला आहे.त्यानंतर राज्य मान्सूनची प्रतीक्षा आहे. आता येत्या ७ ते ८ जून २०२४ ला मान्सून तळकोकणात दाखल होणार असल्याचा अंदाज आहे.तसेच पुढील दोन दिवस राज्यात आता मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. मराठवाडा, कोकण, मध्य महाराष्ट्रात जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.राज्यात गेल्या काही दिवसांपासून तापमानात मोठी वाढ झाली होती.अनेक जिल्ह्यांत उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला होता.मात्र आता राज्यात पावसाचा अंदाज असल्याने काहीसा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.त्यातच येत्या २ ते ३ दिवसात मान्सून कर्नाटकात पोहोचण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.तर ७ ते ८ जून २०२४ पर्यंत मान्सून राज्याच्या प्रवेशद्वार असलेल्या सिंधुदुर्गात दाखल होण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.तसेच ६, ७ आणि ८ जून रोजी अरबी समुद्रात देखील एक प्रणाली सक्रिय होणार आहे. सिंधुदुर्ग, रायगड, रत्नागिरी, ठाणे, मुंबई, पालघरच्या काही भागात तीन दिवस ढगाळ वातावरण राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.२ जून ते ८ जून २०२४ अनेक भागात पाऊस सक्रिय होण्याची शक्यता आहे.

 

मान्सूनपुर्व पाऊस सक्रिय होणार

तसेच जूनच्या सुरुवातीला मान्सूनपुर्व पाऊस राज्यात सक्रिय होणार आहे. त्याप्रमाणे २ जून २०२४ रोजी दक्षिण पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर, सांगली, धाराशिव, लातूर, नांदेडमध्ये पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज आहे.

तर ३, ४ आणि ५ जून २०२४ रोजी मध्य महाराष्ट्रातील अहमदनगर, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, पुणे, सातारा, कोल्हापूर, बीड, जालन्यात मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button