कोल्हापूर डाक विभागाच्या प्रवर डाक अधीक्षकपदी अनुराग निखारे
प्रतिनिधी / रोहन भिऊंगडे
कोल्हापूर, कोल्हापूर डाक विभागाच्या प्रवर डाक अधीक्षकपदी अनुराग निखारे यांची नियुक्ती झाली असून त्यांनी आपल्या पदाचा कार्यभार नुकताच स्विकारला.
अनुराग उमाकांत निखारे (भा. डा. से.) हे सन 2018 साली युपीएससी परीक्षेमध्ये उत्तीर्ण होऊन सन 2019 साली भारतीय डाक सेवेमध्ये रुजु झाले. मुळचे नाशिकचे असलेले अनुराग निखारे यांचे शिक्षण मुंबई येथे झाले आहे. नोव्हेंबर 2021 मध्ये मेरठ (उत्तर प्रदेश) येथे प्रवर डाक अधीक्षक या पदाचा पदभार सांभाळला आहे. त्यांचा मेरठ येथील 3 वर्षाच्या कालावधीमध्ये मेरठ डाक विभागामध्ये पोस्ट ऑफीसच्या सर्व योजना घरोघरी पोहचविण्याचे काम अत्यंत प्रभावीपणे केले. तसेच लोकांची आधार कार्ड सहजरित्या उपलब्ध करुन दिली आहेत.
कोल्हापूर डाक विभाग हा देशामध्ये अग्रगण्य असून तो यापुढेही अधिक गतीशील ठेवण्यासाठी सर्वांच्या सहकार्यातून सातत्यपूर्वक प्रयत्न केले जातील, असे आवाहन त्यांनी कोल्हापूर डाक विभागाचा पदभार स्विकारल्यानंतर केले.