आ. ऋतुराज पाटील यांच्या फुलेवाडी, लक्षतीर्थ प्रचारफेरी हजारो नागरिकांचा जनसमुदाय रस्त्यावर उतरला
आ. ऋतुराज पाटील यांच्या फुलेवाडी, लक्षतीर्थ प्रचारफेरी हजारो नागरिकांचा जनसमुदाय रस्त्यावर उतरला
रिक्षाचालकांनी सहभागी होत आमदार ऋतुराज पाटील यांना दिला बिनशर्त पाठिंबा
कोल्हापूर – कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार आमदार ऋतुराज पाटील यांच्या प्रचारार्थ फुलेवाडी आणि लक्षतीर्थ वसाहत प्रभागात प्रचार फेरी काढण्यात आली. या प्रचार फेरीत हजारो लोकांनी उत्स्फूर्तपणे सहभागी होत आमदार ऋतुराज पाटील यांना पाठिंबा जाहीर केला.
यावेळी आमदार ऋतुराज पाटील यांनी बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो हातात घेवून हात उंचावल्या त्या नंतर कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. दक्षिणचा एकच आवाज ऋतुराज…ऋतुराज.. अशा घोषणा देत हातात नागरिक या फेरीत सहभागी झाले होते. फुलेवाडी 6 व्या बस स्टॉप इथून सुरू झालेली ही प्रचार फेरी पाचवा स्टॉप मार्गे फुलेवाडी येथील प्रमुख मार्गावरून जुन्या जकात नाक्यापर्यंत काढण्यात आली. या प्रचार फेरीत माजी नगरसेवक राहुल माने, नागोजीराव पाटील ,संदीप बाबुराव पाटील,पांडुरंग दिवसे, शामराव माने ,प्रदीप माने ,राजाराम भोंगाळे, अमर अपराध , विकी मोहिते, वसंत लोकरे ,राहुल अतिग्रे, अनिल बोडके, योगेश दरवान, संदीप इंगवले, अमर पाटील, भरत माने, राहुल लाड, विशाल पाटील, बाजीराव पाटील, गौरव मोरे ,बबलू साळुंखे ,ओंकार लोकरे ,योगेश दरवान, निलेश दरवाण, भाऊ आरेकर ,संजय लवटे, संग्राम पाटील, गणेश घाडगे यांच्यासह फुलेवाडी परिसरातील नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते.
फुलेवाडीतील रॅली दरम्यान हजारो नागरिकांचा जनसमुदाय रस्त्यावर उतरल्याचं चित्र पहायला मिळालं.या रॅलीत फुलेवाडी परिसरातील शंभरहून अधिक रिक्षाचालकांनी सहभागी होत आमदार ऋतुराज पाटील यांना पाठिंबा दिला. दरम्यान यानंतर आमदार ऋतुराज पाटील यांनी लक्षतीर्थ वसाहत इथं प्रचार फेरी काढली. फुलेवाडी प्रमाणं लक्षतीर्थ वसाहत परिसरात देखील हजारो नागरिकांनी आमदार ऋतुराज पाटील यांच्या प्रचार फेरीत उतस्फुर्तपणे सहभागी होत त्यांच्या विजयाच्या घोषणा दिल्या.
या प्रचार फेरीत माजी नगरसेवक आनंदराव खेडकर ,तात्या मेजर सुभाष पाटील, माजी नगरसेवक नंदकुमार सूर्यवंशी, बाबुराव बोडके, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते चंद्रशेखर इंगवले, बाबुराव बोडके, भैय्या खेडकर, अनिल पाटील, प्रदीप पाटील ,दीपक पाटील,भैय्या गोलंदाज, पार्थ राऊत, दिलीप राऊत, सचिन राऊत, प्रफुल्ल राऊत, प्रमोद पाटील, अक्षय चव्हाण ,आशिष चौगुले, राजू गस्ते ,अजय शिंदे, उदय बंदरे ,अमोल बंदरे ,आनंदराव पाटील, अनिल पाटील, अमोल बंदरे,संदीप पाटील ,अविनाश पाटील, रोहित जाधव ,छोटू चव्हाण ,चंद्रसिंग चव्हाण, गौरी जाधव, संजय कात्रट, सारंग येडगे, वंदना मालप, संग्राम राठोड, वसंत मालदार, सचिन जाधव,आयेशा स्वार, सुधा पाटील यांच्यासह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येनं
सहभागी झाले होते.