कोल्हापूर शहर

कोल्हापुरात उमेदवारावरच जीवघेणा हल्ला : खाजगी हॉस्पिटलात उपचार सुरु

करवीर मतदारसंघात खळबळजनक प्रकार

करवीर विधानसभा मतदारसंघातील जनसुराज्य पक्षाचे उमेदवार संताजी घोरपडे यांच्यावर जीवघेणा हल्ला

 

कोल्हापूर – निवडणुकीचा प्रचार शेवटच्या टप्प्यात आला असताना करवीर विधानसभा मतदारसंघात एक खळबळजनक घटना घडलीय. करवीर विधानसभा मतदारसंघातील जनसुराज्य पक्षाचे उमेदवार संताजी घोरपडे यांच्यावर जीवघेणा हल्ला झालाय. सध्या त्यांच्यावर राजारामपुरीतील मोरया हॉस्पिटलात उपचार सुरु आहे.

संताजी घोरपडे हे रविवारी रात्री प्रचार संपवून आपल्या सहकाऱ्यांसह कोल्हापूरकडे परतत असताना मनवाड येथे सहा ते सात लोकांनी त्यांची गाडी थांबवली. जनसुराज्य पक्षाचे कार्यकर्ते आपल्याला भेटायला थांबले असतील, असे संताजी घोरपडे यांना वाटले. त्यामुळे ते आपल्या सहकाऱ्यांसह या लोकांची विचारपूस करण्यासाठी गाडीतून खाली उतरले. त्यावेळी त्या लोकांनी त्यांच्यावर काठ्या आणि भाल्याने हल्ला केला. तसंच त्यांच्या सहकाऱ्यांवरही धारदार शस्त्रांनी हल्ला केला. यामध्ये संताजी घोरपडे यांच्या डोक्याला आणि हाताला दुखापत झालीय. यावेळी मारेकऱ्यांचा हल्ला संताजी घोरपडे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी कसाबसा परतवून लावला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button