रुकडी

अशोकराव माने यांच्या विजयीसाठी कार्यकर्त्यांनी ताकदिने काम करावे :माजी खासदार डॉ.निवेदिता माने 

:रुकडी येथे खासदार माने गटाच्या प्रमुख कार्यकर्त्यांच्या मेळावात बोलताना माजी खासदार डॉ.निवेदिता माने

 

रुकडी ता.९: दलितमित्र अशोकराव माने(बापू)यांनी केलेल्या विकास कामाची पोचपावती देण्याची जबाबदारी आपल्यासारख्या कार्यकर्त्यांची आहे.कोणतेही पद नसताना गेल्या पाच वर्षांमध्ये हातकणंगले विधानसभा मतदारसंघांमध्ये कामाचा डोंगर उभा केला आहे. जनसामान्यांच्या प्रगतीसाठी अविरत झटणारे अशोकराव माने यांच्या विजयीसाठी माने गटाच्या कार्यकर्त्यांनी ताकदीने काम करावे.असे आवाहन माजी खासदार डॉ.निवेदिता माने यांनी केले.त्या हातकणंगले विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार अशोकराव माने यांच्या प्रचारार्थ रुकडी येथे खासदार माने गटाच्या प्रमुख कार्यकर्त्यांचा मेळावात बोलत होत्या.

       यावेळी माजी खासदार निवेदिता माने यांच्या हस्ते व जयसिंगपूरच्या माजी नगराध्यक्ष डॉ.निता माने,विमानतळ सल्लागार समितीचे सदस्य उद्योगपती मधुकर मुसळे या प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत अशोकराव माने यांनी मागील पाच वर्षात केलेल्या कामाच्या पुस्तकाचे प्रकाशन झाले.

 

यावेळी सरपंच रुकडी राजश्री रूकडीकर,उपसरपंच शितल खोत, माजी जिल्हा परिषद सदस्य बबलू मकानदार,माजी सरपंच रफिक कलावंत,अतिग्रे उपसरपंच भगवानराव पाटील,माजी सरपंच किरण भोसले,अनिल बागडी पाटील,राजू अपराध,मोहन इंगळे,राहुल माने,अध्यक्ष माळी समाज राजू माळी,ॲड.सुरज पाटील,शमवेल लोखंडे,हातकणंगले धनगर समाज अध्यक्ष काशिनाथ शिणगारे,सर्व ग्रामपंचायत सदस्य व सर्व मंडळाचे अध्यक्ष उपाध्यक्ष पदाधिकारी, आदी मान्यवर उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button