रुकडीत सीमोल्लंघन सोहळ्याला हवे शिस्तीचे कडे:ग्रामस्थांची अपेक्षा
हुल्लडबाजांना आळा बसवण्याची मागणी
रुकडीत शहाजीराजे शैक्षणिक वसाहतीत (कॅम्प)शाहुकालीन अंबाबाईचे मंदिर आहे.मंदिराचे प्रांगणात सीमोल्लंघन सोहळा पारंपरिक पद्धतीने करण्याची जुनी परंपरा आहे.या सोहळ्यास गावकरी नटून थटून येतात. काम धंद्या निमित्ताने परगावी असणारे ग्रामस्थ मित्र यावेळी आवर्जून येत असल्याने एकमेकांचे भेटीचा हा आनन्द सोहळाच ठरतो.रुकडीचे सुपुत्र खासदार धैर्यशील माने दादांची प्रमुख उपस्थितीही असते. गावातील धनगर समाजाची पालखी आल्यानंतर सूर्यास्तापूर्वी आपट्याच्या पानांची विधिवत पूजा करून तलवारीने इशारा करताच सोने लुटण्याची प्रथा आहे.
मात्र काही वर्षांपासून पूजा होण्यापूर्वीच सोने लुटण्याचा प्रकार घडत आहे.गावच्या परंपरेला हे शोभनीय नाही.दसऱ्यादिवशी हुल्लडबाजांना आळा घालण्यासाठी रिंगण आखून सुरक्षाकडे करण्याची गरज आहे. सोहळ्याची अचूक वेळही समाजमाध्यमाद्वारे आधी जाहीर करावी. सोहळ्याची पारंपारिकता कायम राहून धार्मिक व पवित्र वातावरणात हा सोहळा व्हावा यासाठी स्वयंसेवी संस्था व पोलीस प्रशासनाने प्रयत्न करावेत अशी ग्रामस्थांची अपेक्षा आहे.