रुकडीत रक्तदान शिबिर संपन्न :महिलांनी सुद्धा रक्तदान करून जपली सामाजिक बांधिलकी
जवाहर उद्योग समूह संस्थापक डॉ.सनतकुमार खोत यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबीर
रुकडीत रक्तदान शिबिर संपन्न
महिलांनी सुद्धा रक्तदान करून जपली सामाजिक जपल बांधिलकी
जवाहर उद्योग समूह संस्थापक डॉ.सनतकुमार खोत यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबीर
रुकडी ता.९: येथे जवाहर उद्योग समूह संस्थापक डॉ.सनतकुमार खोत यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबीर संपन्न झाले.यदा रक्तदान शिबिराचे हे १४ वे वर्ष असून ४४ रक्तदात्यानी रक्तदान केले. जवाहर पतसंस्था रुकडी आणि ब्लड डोनर्स ग्रुप,महावीर चौक मित्र मंडळ रुकडी, विराज महाडीक मित्र परिवार यांचे संयुक्त विद्यमाने हे शिबिर घेण्यात आले होते.यामध्ये वर्षा माने, शैलजा पाटील या महिलांनी सुद्धा रक्तदान करून सामाजिक बांधीलकी जपली.
गरजू रुग्णांना वेळेत रक्त पुरवठा व्हावा हा आहे आणि कित्येक गरजू रुग्णांना रक्त देऊन त्यांचे प्राण वाचवण्यात यश येणार आहे तसेच भविष्यात रक्तदाता हा केंद्र बिंदू मानून त्याच्यासाठी नवीन संकल्पना राबवणार असल्याचे नियोजन आहे असे शिबीर आयोजक ब्लड डोनर्स ग्रुप चे संस्थापक कोमल पाटील यांनी सांगितले.
यावेळी उपसरपंच शीतल खोत, संतोष रुकडीकर, दिलीपराव इंगळे, ग्रा. स. शम्मूवेल लोखंडे तसेच सर्व ग्रामपंचायत सदस्य, माजी आमदार डाॅ. सुजित मिणचेकर, सार्थ मिणचेकर, योगेश चोकाककर,अमर आठवले, प्रवीणकुमार माने,ओंकार किणिंगे, अनिल माळी, प्रज्योत माळी, विलास बनक, जय किसान सोसायटी, रुकडीचे संचालक नूर महम्मद मुल्ला गुरुजी,फंटू माळी यांनी भेट दिली. यासाठी कोमल पाटील, किशोर कुंभार,जमीर मुजावर,प्रकाश धनवडे तसेच जवाहर पतसंस्थेचे सर्व संचालक मंडळ, सेवक वर्ग यांनी परिश्रम घेतले.डॉ सनतकुमार खोत, व्हा. चेअरमन मोहनराव इंगळे तसेच सर्व संचालक मंडळ यांचे विशेष सहकार्य लाभले.