कोल्हापूर शहर

प्रशिक्षणात निवडणूक प्रक्रिया समजून घेवून कर्तव्य व जबाबदाऱ्या पार पाडा -निवडणूक निरीक्षक मीर तारीक अली

प्रतिनिधी / रोहन भिऊंगडे
कोल्हापूर,विधानसभा निवडणूक निर्भय भयमुक्त आणि पारदर्शक वातावरणात पार पडण्यासाठी प्रशिक्षणात निवडणूक प्रक्रिया समजून घेवून कर्तव्य आणि सोपविलेली जबाबदारी व्यवस्थितपणे पार पाडावी. निवडणूकीचे पावित्र्य राखण्यासाठी तसेच खुल्या, पारदर्शक आणि शांततापूर्ण व ताणतनावमुक्त वातावरणात नि:पक्षपणे निवडणुका पार पाडण्याबाबत नियोजन करावे, अशी सूचना निवडणूक निरीक्षक मीर तारीक अली यांनी दिली.

निवडणूक निरीक्षक मीर तारीक अली यांनी 276 कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघाच्या प्रशिक्षण सत्रात उपस्थित राहून निवडणूक अधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी संपत खिलारी, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी सैपन नदाफ, संपर्क अधिकारी स्वप्नील पवार, विजय पवार व अशोक पवार उपस्थित होते.

श्री. अली म्हणाले, विधानसभा निवडणूक 2024 च्या प्रक्रियेत मतदान केंद्राध्यक्ष व मतदान अधिकारी यांनी कर्तव्य, मतदान प्रक्रियेतील टप्पे, निवडणूकीतील महत्वाचे बदल समजून घ्यावेत, वेळोवेळी प्रशासनाने दिलेल्या सूचानांची गांर्भीयाने दखल घेऊन त्याप्रमाणे आपली कर्तव्य व जबाबदाऱ्या पाडाव्यात. त्याचबरोबर चिन्हांकित मतदार यादी तपासणी, मतदान यंत्र (EVM), तपासणी, मतदान यंत्रांची (BU) तपासणी, मतदान आदल्या दिवशी मतदान केंद्रावरील पूर्व तयारी, मतदान केंद्राची उभारणी, आदर्श मतदान केंद्राची रचना, मतदान केंद्रावरील सुरक्षा व्यवस्था, संवेदनशील मतदान केंद्राबाबत, मतदान केंद्रावर आंतरजालावरुन प्रक्षेपणाचा वापर (वेबकॉस्टिंग), दिव्यांग मतदारांसाठी विशेष सुविधा, अंध, अपंग मतदारांकडून मतदान, इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र ओळख व जोडणी प्रक्रिया. मतदार पडताळणी योग्य कागदी परिनिरीक्षण निशाणी (VVPAT), अभिरुप मतदान (मॉकपोल) चिठ्या सिल करणे, मतदार यंत्र मोहोरबंद करणे, याचबरोबर निवडणूकीची संपूर्ण कार्यपध्दती समजून घ्यावी, अडचणीबाबत वरिष्ठांकडून मार्गदर्शन घ्यावे, असेही ते म्हणाले.

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button