Blog

पहिल्या दिवशी 5 हजार 140 मतदान कर्मचाऱ्यांनी पोस्टल मतदानाव्दारे बजावला मतदानाचा हक्क

पहिल्या दिवशी 5 हजार 140 मतदान कर्मचाऱ्यांनी पोस्टल मतदानाव्दारे बजावला मतदानाचा हक्क

प्रतिनिधी / रोहन भिऊंगडे

कोल्हापूर, जिल्हयातील 10 विधानसभा मतदारसंघात मतदान प्रक्रियेत सहभागी असणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांसाठी 9 व 10 नोव्हेंबर रोजी पोस्टल मतदान प्रक्रिया सुरु आहे. आज पहिल्या दिवशी झालेल्या पोस्टल मतदान प्रक्रियेमध्ये *जिल्हयातील 5 हजार 140* मतदार कर्मचाऱ्यांनी मतदानाचा हक्क बजावला.

यामध्ये 271- चंदगड विधानसभा मतदारसंघात 655,

272-राधानगरी विधानसभा मतदारसंघात 635,

273- कागल विधानसभा मतदारसंघात 448,

274- कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघात 589,

275- करवीर विधानसभा मतदारसंघात 616,

276- कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघात 463,

277-शाहूवाडी विधानसभा मतदारसंघात 421,

278- हातकणंगले विधानसभा मतदारसंघात 438,

279- इचलकरंजी विधानसभा मतदारसंघात 481 व

280- शिरोळ विधानसभा मतदारसंघात 394

अशा एकूण 5140 मतदार कर्मचाऱ्यांनी पोस्टल मतदानाव्दारे पहिल्या दिवशी मतदानाचा हक्क बजावला. उद्या उर्वरित मतदान होणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button