मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियान टप्पा दोनमध्ये माथेरान प्राथमिक शाळा प्रथम
मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियान टप्पा २ सन २०२४- २५ प्रथम क्रमांक माथेरान प्राथमिक शाळेला
सत्याचा शिलेदार वार्तापत्र प्रतिनिधी
चंद्रकांत काळे.
संपर्क क्रमांक८२३७१०१७१९.
विविध स्पर्धात्मक उपक्रमावर आधारित “मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा ” हे अनोखे अभियान राज्यात मागील वर्षापासून राबविण्यास सुरुवात झाली.
रायगड जिल्ह्यामध्ये शासकीय शाळा गटातून प्रथम क्रमांक माथेरान गिरीश स्थान नगर परिषदेचे वीर हुतात्मा भाई कोतवाल प्राथमिक विद्यामंदिर शाळेतील मुख्याध्यापक दिलीप हिरामण अहिरे सह ९ संख्या शिक्षकांचा समूह विद्यार्थ्यांचा कलात्मक विकास विविध खेळांमध्ये मिळवलेले प्राविण्य गुणात्मक विकास शाळेचा भौतिक विकास या सर्व होकारात्मक कला गुण लक्षात घेता माथेरान येथील नगरपरिषद प्राथमिक शाळा या शाळेचा असून सदर शाळेला ११ लाख रुपये पारितोषिक जाहीर करण्यात येत आहे. त्याचप्रमाणे द्वितीय क्रमांक रायगड जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खारपाडा तालुका पेण या शाळेचा असून या शाळेस ५ लाख रुपये पारितोषिक देण्यात येत आहे .त्याचप्रमाणे तृतीय क्रमांक रायगड जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोलमांडले तालुका श्रीवर्धन या शाळेने तीन लक्ष रुपये चे पारितोषिक पटकावले आहे खाजगी शाळा गटातून श्रीराज एज्युकेशन ट्रस्ट तालुका सुधागड या शाळेचा प्रथम क्रमांक आला असून ११ लाख रुपये चे पारितोषिक पटकावले आहे. चांगु काना ठाकूर विद्यालय पनवेल या शाळेने द्वितीय क्रमांक पटकावला असून या शाळेत ५ लाख रुपये बक्षीस देण्यात येत आहे .त्याचप्रमाणे आशा किरण इंग्लिश मिडियम स्कूल पानेड तालुका पेण या शाळेने तृतीय क्रमांक पटकावला असून सदर शाळेस ३ लक्ष रुपये पारितोषिक देण्यात येत आहे. याव्यतिरिक्त तालुकास्तरावर प्रथम, द्वितीय व तृतीय असे क्रमांक शासकीय शाळा व खाजगी शाळा स्तरादरम्यान जाहीर केले जातील आणि प्रथम क्रमांकास ३ लाख रुपये द्वितीय क्रमांक २ लाख रुपये व तृतीय क्रमांक एक लाख रुपये असे पारितोषिक देण्यात येईल रायगड जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणामध्ये या अभियानासाठी शाळा, शिक्षक विद्यार्थी यांनी सहभाग नोंदविला आहे त्या सर्वांचे मुख्य कार्यकारी अधिकारी। डॉ श्री भरत बास्टेवाड व शिक्षणाधिकारी प्राथमिक श्रीमती पुनिता गुरव यांनी अभिनंदन केलेले आहे त्याचप्रमाणे सर्व विभाग स्तर जिल्हास्तर व तालुकास्तर विजेत्या शाळांचे अभिनंदन केलेले आहे. आपले विद्यार्थी प्राथमिक शाळेत शिकून जिल्हास्तरीय शालेय प्रगतिशील यश मिळवत असल्याने पालकांमध्ये सुद्धा आनंदाचे व अभिमान वाटावा असे वातावरण दिसून येत आहे …..