चिकुर्डे येथील तांबडे भावंडांनी घातले अनोख्या : स्तोत्र पठण स्पर्धा
स्तोत्र पठण स्पर्धेतील विदयार्थ्यांना बक्षीस वितरण करताना तांबडे परिवार.
वर्षश्राद्धाचा खर्च टाळून तांबडे भावंडांनी घातले अनोख्या पद्धतीने आपल्या आईचे वर्षश्राद्ध
चिकुर्डे येथील सेंद्रिय शेती करणारे प्रगतशील शेतकरी श्री सुशांत तांबडे, सुजय तांबडे आणि त्यांच्या भगिनीं श्रीमती सुलभा तांबडे यांनी त्यांच्या मातोश्री कै. लता तांबडे यांच्या तिसऱ्या वर्ष श्राद्ध चा खर्च टाळून अनोख्या पद्धतीने वर्ष श्राद्ध घातले. सामाजिक जाणीव असलेल्या या भावंडांनी
चिकुर्डे मधील यशवंत प्रा आश्रम शाळा, जि. प शाळा तसेच आनंद गुरुकुल व भारतमाता विद्यालयात स्तोत्र पठण स्पर्धा घेऊण त्यातील प्रत्येक शाळेतून दोन गटातून प्रथम, द्वितीय आणि तृतीय आलेल्या विदयार्थ्यांना प्रशस्तीपत्र आणि सन्मान चिन्ह देऊन विद्यार्थ्यांच्यात वाचनाची आणि पाठांतराची गोडी लावणारा उपक्रम राबविला.
तसेच सुशांत तांबडे यांच्या भगिनी श्रीमती सुलभा तांबडे यांनी, त्या कार्यरत असलेल्या संवाद समुपदेशन केंद्र सांगली च्या वतीने चिकुर्डे मधील सर्व,शाळांमध्ये विदयार्थीनींसाठी Good Tuch -Bad Tuch विषयी कार्यशाळेचे आयोजन करून विदयार्थीनीच्यात जागृती निर्माण करण्याचे काम यानिमित्