कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या जयंतीनिमित्त पंडित नेहरू विद्यालयात बक्षीस वितरण व समुपदेशन कार्यक्रम संपन्न
कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या जयंतीनिमित्त पंडित नेहरू विद्यालयात बक्षीस वितरण व समुपदेशन कार्यक्रम संपन्न
मिरज:- संजय पवार
कवलापूर येथील पंडित नेहरू विद्यालयात कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या जयंतीनिमित्त विविध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत जे विद्यार्थ्यां विद्यार्थीनी सहभागी झाले होते त्या स्पर्धेतील प्रथम तीन क्रमांक आलेल्या विविध स्पर्धेचे बक्षीस वितरण समारंभ सहाय्यक पोलीस निरीक्षक कल्याणी शिंदे, कवलापूरच्या सरपंच विद्या माळी, उपसरपंच प्रमोद पाटील, पोलीस पाटील दत्तात्रय बेडगे, यांच्या हस्ते बक्षीस वितरण समारंभ करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अवचित्य साधून सहाय्यक पोलीस निरीक्षक कल्याणी शिंदे यांनी सर्व विद्यार्थी विद्यार्थिनींना समुपदेशन करण्यात आले. या कार्यक्रमाच्या वेळी उज्वला गुंडे, सुनिल लाड, संतोष नलवडे, हरीष हाक्के, सोमनाथ घाडगे, विश्वनाथ पाटील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी, विद्यार्थिनी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे स्वागत प्राचार्य चंद्रकांत पाटील यांनी केले सूत्रसंचालन घंटे मॅडम यांनी केले तर पर्यवेक्षक मुरलीधर पवार यांनी आभार मानले.