शिक्षण सेवक सह. पतसंस्थेच्या चेअरमन पदी विलास यमगर तर व्हा.चेअरमन पदी उदयसिंह पाटील यांची बिनविरोध निवड
शिक्षण सेवक सह. पतसंस्थेच्या चेअरमन पदी विलास यमगर तर व्हा.चेअरमन पदी उदयसिंह पाटील यांची बिनविरोध निवड
मिरज :- संजय पवार
सांगली जिल्ह्यातील शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची शिक्षण सेवक सहकारी पतसंस्थेच्या चेअरमन पदी विलास यमगर तर व्हा. चेअरमन पदी उदयसिंह पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली. सेक्रेटरी पदी निशांत जाधव यांची फेरनिवड करण्यात आली. चेअरमन विलास यमगर दैनिक हिंदू सम्राट च्या प्रतिनिधीशी बोलताना म्हणाले संस्थेच्या प्रगतीसाठी व सभासदांच्या फायद्यासाठी वेगवेगळ्या योजना राबविण्यात येतील असा मानस आहे संस्थेच्या प्रगतीचा आलेख वाढवून सभासद संख्या सुद्धा वाढवण्यात येईल असा विश्वास दिला. यावेळी दैनिक हिंदू सम्राट चे प्रतिनिधी संजय पवार यांच्या हस्ते चेअरमन पदी निवड झाल्याबद्दल विलास यमगर यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी संचालिका अनिता घोरपडे, तज्ञ संचालक विजय काशीद, मार्गदर्शक अर्जुन पाटील व्यवस्थापक उत्तम लाड, अण्णा थोरबोले, किशोर गोसावी, अशोक घोरपडे व सर्व कर्मचारी उपस्थित होते.