निरोगी आरोग्यकारिता पौष्टिक अन्न गरजेचे – कुलगुरू प्रा. डॉ. के प्रथापन
तळसंदे: प्रा. डॉ. उदय अन्नापुरे यांचे स्वागत करताना प्रा. डॉ. के प्रथापन. समवेत प्रा. डॉ. जयेंद्र खोत, डॉ. गुरुनाथ मोटे, सुजित सरनाईक, डॉ. शिवानंद शिरकोळे आदी.
डी. वाय. पाटील कृषी व तंत्र विद्यापीठात जागतिक अन्न दिन उत्साहात
तळसंदे : चांगले जीवन आणि निरोगी आरोग्यकारिता पौष्टिक अन्न पदार्थंचे सेवन अत्यावश्यक असल्याचे प्रतिपादन डी. वाय. पाटील कृषी व तंत्र विद्यापीठ, तळसंदेचे कुलगुरू प्रा. डॉ. के प्रथापन यांनी केले. विद्यापीठात आयोजित जागतिक अन्न दिवस कार्यक्रमात ते बोलत होते.
डी. वाय. पाटील कृषि आणि तंत्रज्ञान विद्यापीठ तळसंदे अंतर्गत अन्न तंत्रज्ञान विभागाच्यावतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विविध विषयावर पोस्टर प्रेझेन्टेशन,नोव्हेल फुड्स प्रदर्शन आदी उपक्रम राबविण्यात आले. यावेळी बोलताना डॉ. के. प्रथापन म्हणाले, उत्तम जीवन आणि चांगल्या भविष्यासाठी अन्नाचा अधिकार ही यावर्षीची थीम असून याबाबत जागरुकता निर्माण करण्याची आज गरज आहे. अन्न आणि पाणी याची नाखाडी रोखण्यासाठी विद्यार्थ्यांनी जनजागृती करावी त्याची सुरुवात स्वत:पासून करावी. सध्याच्या जगात वेगवेगळे आजार वाढत असून ते रोखण्यासाठी पौष्टिक आहाराचा जास्तीत जास्त वापर गरजेचा आहे. पोषक आहाराची निर्मिती क्षेत्रात फुड टेक्नॉलॉजीच्या विद्यार्थ्याना भविष्यात करिअरच्या अमाप संधी उपलब्ध होणार आहेत.
कुलसचिव डॉ. जे. ए. खोत म्हणाले, आज अन्न न मिळाल्यामुळे अनेक लोक कुपोषण सारख्या गंभीर समस्यांना तोंड देत आहेत. अन्नाची नासाडी रोखून ज्यांना अन्नाची गरज आहे त्यांना ते मिळावे यासाठी जाणीव जागृती करावी.
सहयोगी अधिष्ठाता डॉ. गुरुनाथ मोरे यांनी अन्न सुरक्षा, पौष्टीक आहार, आणि अन्न अन्न प्रक्रिया उद्योगातील संधीबद्दल मार्गदर्शन केले.
प्रमुख पाहुणे इन्स्टिटयूट ऑफ केमिकल टेकनॉलॉजि मुंबईचे वरिष्ठ प्राध्यापक डॉ. उदय अन्नापुरे म्हणाले, प्रत्येक सजीवाला जगण्यासाठी अन्नची गरज असते. आधुनिक बदलत्या जिवन शैलीत, बदलत्या हवामानात पीकावरील परिणाम अप्रत्यक्ष्य -अप्रत्यक्ष्यरित्या मनुष्याच्या शरीरावर परिमाण करत आहे. आहारामुळे आजार, स्वभाव, वैचारिक बदल दिसून येतात असे सांगून प्लाज्मा टेकनॉलॉजी या विषयावर त्यांनी सखोल मार्गदर्शन केले.
यावेळी वित्त अधिकारी सुजित सरनाईक, डॉ. संग्राम पाटील, संशोधन असंचालक डॉ. शिवानंद शिरकुळे, डॉ. व्ही.एम. इंगळे, प्रा. सौ. नमिता पाटील, प्रा. शितल पाटील, प्रा. तेजश्री पाटील प्रा. के.एम. चक्रे, प्रा. स्नेहल खांडेकर, प्रा. स्वप्नाली भोळे, धनेश गवळी, प्रा. स्मितल आदी कांबळे उपस्थित होते.
या उपक्रमासाठी कुलपती डॉ. संजय डी. पाटील, संस्थेचे उपाध्यक्ष आमदार सतेज पाटील, विश्वस्त आमदार ऋतुराज तर पाटील, कार्यकारी संचालक डॉ. ए. के. गुप्ता यांचे मार्गदर्शन लाभले.