पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या १३७ वी जयंती पंडित नेहरू विद्यालयात साजरी
मिरज:- संजय पवार
कोल्हापूर येथील पंडित नेहरू विद्यालयात पद्मभूषण डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय ऍड.अजितराव सूर्यवंशी सदस्य जनरल बॉडी रयत शिक्षण संस्था सातारा, तर प्रमुख पाहुणे प्राध्यापक डॉक्टर एन. डी. धनवडे आझाद कॉलेज ऑफ एज्युकेशन सातारा हे होते. श्री एन. डी. धनवडे यांनी कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या लहानपणापासून ते रयत शिक्षण संस्थेची उभारणी, घडवलेले विद्यार्थी, स्वखर्चाने परदेशी पाठवलेले विद्यार्थी कसे घडवले,कोण कोणत्या अडचणींना तोंड द्यावे लागले, त्यावर मात कशी केली, याबद्दल गोष्टी रूपाने सांगितले.
कार्यक्रमाचे अवचित साधून माजी विद्यार्थी विष्णू मोहिते दैनिक सकाळचे सांगली आवृत्तीचे उपसंपादक पदी पदोन्नती झाल्याबद्दल शाळेच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी माजी विद्यार्थी 1988-89 च्या एसएससी बॅचने 52 खुर्च्या शाळेत भेट म्हणून दिल्या. एसएससी परीक्षेत प्रथम आलेल्या विद्यार्थी प्रमोद पाटील यास पाच हजाराचे बक्षीस देऊन त्याचा सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमाचे स्वागत व प्रस्ताविक प्राचार्य चंद्रकांत पाटील यांनी केले याप्रसंगी विनायक संकपाळ, पर्यवेक्षक मुरलीधर पवार सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी उपस्थीत होते. कार्यक्रमाचे आभार गुरव सर यांनी मानले.