तालुका हातकणंगले वार्ता

वैद्यकीय पदवी ही माणसातील दैवत्व प्राप्त करून देणारी पदवी आहे :  डॉ.वर्षा राठोड

नवे पारगाव येथील तात्यासाहेब करीत दंत महाविद्यालयाच्या आंतरवासिता निरोप व गुणगौरव समारंभात आदर्श आंतरवासिता म्हणून डॉ. साई पाटोळे यांचा सत्कार करताना डॉ. शिल्पाताई कोठावळे, डॉ. वर्षा राठोड, प्राचार्य डॉ. हरीष कुलकर्णी.

 

वैद्यकीय पदवी ही माणसातील दैवत्व प्राप्त करून देणारी पदवी आहे.

 

वैद्यकांनी उपचारातील गुणवत्ता कायम राखावी.

 

भारतीय शास्त्राप्रमाणे वैद्यकांनी आदर्श गोष्टींचे पालन करावे : डॉ.वर्षा राठोड.

 

नवे पारगाव वार्ताहर

 

वैद्यकीय पदवी ही केवळ कागदी प्रत नसून माणसातील दैवत्व प्राप्त करून देणारी पदवी आहे. वैद्यकीय क्षेत्रातील प्रत्येक वैद्यकाने उपचारातील गुणवत्ता राखावी. स्वतःला झोकून देऊन रुग्णसेवा करावी. मूल्य आणि नीतिमत्ता जपून रुग्णसेवा करा .भारतीय शास्त्रात सांगितल्याप्रमाणे वैद्यकांनी आदर्श गोष्टीचे पालन करावे.

ध्येय गाठण्यासाठी अथक परिश्रम करा. आई, वडील व गुरू यांना आयुष्यात विसरू नका. एकमेकांना मदत करा .चुका मधून नवीन ज्ञान शिका .कोणत्याही परिस्थितीत हार मानू नका. स्वतःचे ध्येय पूर्ण करा. दंत वैद्यकीय क्षेत्रामध्ये देश विदेशातील असणाऱ्या संधीचं सोनं करा. असे प्रतिपादन डॉ. डी. वाय. पाटील वैद्यकीय विद्यापीठ मुंबईच्या डॉ. वर्षा राठोड यांनी केले.

डॉ. वर्षा राठोड नवे पारगाव ता. हातकणंगले येथील तात्यासाहेब कोरे दंत महाविद्यालय व संशोधन केंद्राच्या आंतरवासिता विद्यार्थ्यांच्या निरोप व गौरव समारंभ प्रसंगी प्रमुख पाहुण्या म्हणून बोलत होत्या .अध्यक्षस्थानी दंत महाविद्यालयाच्या व्यवस्थापकीय प्रतिनिधी डॉ. शिल्पाताई कोठावळे होत्या. प्राचार्य डॉ. हरीष कुलकर्णी प्रमुख उपस्थित होते. दीपप्रज्वलन व प्रतिमापूजन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते झाले.

स्वागत व प्रास्ताविक भाषणात प्राचार्य डॉ. हरीष कुलकर्णी यांनी दंत महाविद्यालयाच्या कार्याचा आढावा घेतला .

डॉ .वर्षा राठोड यांनी भाषणात सुखी व प्रगत मानवी जीवनावर आधारित संस्कृत सुभाषिताची पंचसूत्री स्पष्ट केली यावेळी झालेल्या भाषणात डॉ .शिल्पाताई कोठावळे यांनी तणाव नियंत्रण करण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न करावेत .तणाव नियंत्रण करून आदर्श जीवनपद्धती आचरणात आणावी. मनशांती मिळण्यासाठी प्रयत्न करावेत .यासाठी स्वतःच्या मनाचा अभ्यास करून स्वतःमधील दोष दूर करावेत. स्वतःमध्ये परिवर्तन करून आदर्श व्यक्तिमत्व तयार करावे .परमेश्वराचे व आई-वडिलांचे आशीर्वाद मिळण्यासाठी साधना मार्गाचा अवलंब करा असे सांगितले.

प्राचार्य डॉ. हरीष कुलकर्णी यांच्या सेवेस वीस वर्ष पूर्ण झाल्याबद्दल उपस्थित मान्यवरांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. सर्व विभाग प्रमुखांचाही सत्कार करण्यात आला.आदर्श आंतरवासिता पुरस्कार डॉ. साई पाटोळे यांना देण्यात आला .त्यांचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. तसेच सर्व आंतरवासिता डॉक्टरांचा प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला.

 

यावेळी स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे प्राचार्य दिलीप चरणे, संजय लोंढे डॉ. जयंत भांबर ,डॉ. सृष्टी जाजू डॉ मुग्धा शहा यांची भाषणे झाली .

. डॉ .अनिरुद्ध वारेकर यांनी प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून दिला. डॉ. विरसेन पाटील व डॉ. स्नेहल शेंडे यांनी कार्यक्रम समन्वयक म्हणून काम पाहिले.

यावेळी डॉ. सूर्यकांत मेटकरी, डॉ.गायत्री कुलकर्णी,डॉ. संगीता गोलवलकर , डॉ किशोर चौगुले , डॉ.नंदन राव ,डॉ. अभिजीत देशपांडे, डॉ अमित पदमाई, डॉ.योजना पाटील,डॉ सुमित शेटगार ,डॉ प्रज्ञा खटावकर, डॉ.सुधा पाटील- हंचनाळे, डॉ कार्तिक सोमासुंदरम ,डॉ .माधुरी निकम, डॉ प्रज्ञा वाघ, सर्व प्राध्यापक वर्ग, पालक व विद्यार्थी उपस्थित होते. सूत्रसंचालन पलक वर्मा, गायत्री भोसले ,डॉ. केतकी कुलकर्णी डॉ. पूजा अतिग्रे यांनी केले. आभार डॉ. पूजा पाटील यांनी मानले.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button