सातारा जिल्हा
डीपीच्या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढावा:पत्रकार रघुनाथ थोरात यांचे निवेदन
कळंत्रेवाडी,ता.कराड येथील उत्तरमांड नदीकाठालगत असलेल्या स्मशानभूमी जवळच्या विद्युत डीपीच्या समस्येवर महावितरणने कायमस्वरूपी तोडगा काढावा अशी मागणी पत्रकार रघुनाथ थोरात यांनी उंब्रज महावितरणचे उपकार्यकारी अभियंता विद्या जाधव यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे. निवेदनात पुढे म्हटले आहे की,मौजे कळंत्रेवाडी येथील स्मशानभूमी जवळील विद्युत डीपी मध्ये सतत तांत्रिक बिघाड होत असतात.सतत फ्युज निकामी होतात. त्यामुळे शेतकऱ्यांना शेतीला पाणी देणे अवघड झाले असून प्रचंड नाहक मनस्ताप होत आहे. तरी सदर डीपीचा सर्व्हे करून डीपी मध्ये सतत उद्भवणाऱ्या तांत्रिक बिघाडांचे कारण शोधून कायमस्वरूपी तोडगा काढावा. आता या निवेदनावर महावितरण काय भूमिका घेणार? हे येणारा काळच सांगेल.