सातारा जिल्हा

सामाजिक कार्यकर्ते प्रताप भणगे यांचा पाठपुरावा :जातीच्या दाखल्याचा वनवास संपला

सामाजिक कार्यकर्ते प्रताप भणगे यांच्या पाठपुराव्यामुळे

कुमारी आसावरी अर्जुन होळकर हिचा जातीच्या दाखल्याचा वनवास संपलाय.आसावरीची घरची परिस्थिती अगदी हालाखीची असतानाही शिकण्याची जिद्द,आई-वडील आगाशिवनगर,मलकापूर ता. कराड येथे मजुरी काम करून उदरनिर्वाह करतात. मुलगी ही शिक्षणासाठी आजोळी मौजे विठ्ठलवाडी गावात राहत आहे. अभ्यासाची आवड असल्यामुळे आणि चांगले मार्क्स पडत असल्यामुळे पुढील शैक्षणिक सवलती मिळवण्यासाठी जातीचा दाखला आवश्यक आहे हे समजल्यानंतर त्यासाठी अनेक ठिकाणी प्रयत्न करून ही तिच्या कुटुंबाला कागदपत्राचा कुठेही ठाव ठिकाणा लागला नाही.

याची माहिती संबंधित कुटुंबाने सामाजिक कार्यकर्ते तसेच धगधगती मुंबई कराड तालुका प्रतिनिधी प्रताप भणगे यांना सांगितली.सदर माहिती मिळाल्यानंतर जातीच्या दाखल्यासाठी लागणाऱ्या कागदपत्राची शोध मोहीम चालू झाली. दाखल्यासाठी लागणारी कागदपत्रे कराड नगरपालिका, चाफळ, पाटण, पुसेसावळी, वडूज अश्या तीन तालुक्यात शोधून काढावी लागली. यासाठी जवळ जवळ एक महिना लागला,शासकीय व्यवस्थेतील अनेक चांगले वाईट अनुभव ही आले त्यात अनेक जणांचे सहकार्य लाभले यात विठ्ठलवाडी जि.प.प्रा.शाळेचे माजी मुख्याध्यापक दिनेश थोरात सर,पाटणचे मित्र वसंत लोहार सर, तुळसणचे मित्र श्रीधर नलवडे तसेच महेश मोरे अश्या अनेक लोकांचे सहकार्य दाखला मिळवण्यासाठी झाले.कोणतीही गोष्ट एक एकट्याने करणे शक्य नसते.परंतु,अनेकांचे हात लागल्यावर ती अशक्य गोष्ट ही लवकर शक्य होते.ते म्हणतात ना, “प्रयत्ने वाळूचे कण रगडिता तेलही गळे” या म्हणी प्रमाणे एक ही पुरावा जवळ नसतानाही सर्व पुरावे जमा करण्यात मदत मिळाली आणि जे शक्य नव्हते ते शक्य झाले.आज मिळालेला दाखला कु आसावरी हिला देत असताना आसावरीच्या चेहऱ्यावरती एक प्रकारचा आनंद दिसून आला आणि तिला इथून पुढे हि तिच्या पुढील शिक्षणात अशाच प्रकारे यश मिळावे.

 

 

जातीचा दाखला हा कास्ट मधील विद्यार्थ्यांना अत्यंत महत्त्वाचा असून तो वेळेत पालकांनी काढून घ्यावा. पुराव्यासाठी अनेक पर्याय उपलब्ध आहेत. त्यामुळे पालकांनी योग्य माहिती घेऊन दाखले लवकर काढून घ्यावेत. 

 प्रताप भणगे(सामाजिक कार्यकर्ते)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button