सातारा जिल्हा

ओव्हरलोड डीपीचा शेतकऱ्यांना घोर

 

रघुनाथ थोरात

 

कळंत्रेवाडी,ता.कराड येथे उत्तरमांड नदीकाठालगत असलेल्या स्मशानभूमी नजीकचा महावितरणचा विद्युत डीपी सतत ओव्हरलोड स्थितीत जात आहे.त्यामुळे येथील शेतकऱ्यांच्या जीवाला घोर लागून राहिला आहे. सदर डीपी ओव्हरलोड मध्ये असल्यामुळे वरचेवर फ्युज निकामी होणे,काही ना काही तांत्रिक बिघाड होणे या गोष्टी नित्याच्याच झाल्या आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या पिकांना धड पाणी देता येत नाही. फ्युज निकामी झाल्यानंतर सतत वायरमेनला बोलवून तो उपलब्ध होणे अशक्यप्राय गोष्ट आहे. त्यामुळे पिके जगवण्यासाठी शेतकऱ्यांना धोका पत्करून फ्यूज बसवाव्या लागत आहेत. त्यातून शेतकऱ्यांची नुसतीच धावपळ होते. पिकांचे पाणी उरकत नसल्याकारणाने नाहक मनस्ताप सहन करावा लागत असल्याच्या प्रतिक्रिया शेतकरी देत आहेत. त्यामुळे महावितरणने सदर डीपीची स्थळ पाहणी करून डीपी ओव्हरलोड होण्यापाठीमागील कारणे शोधून या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढावा अशी मागणी त्रस्त शेतकरी करीत आहेत.

 

महावितरणने डीपीची क्षमता वाढवणे गरजेचे

सतत ओव्हरलोड होत असलेल्या या डीपीची क्षमता तसेच सध्या सदर डीपीवर असलेला लोड तपासावा आणि गरजेनुसार क्षमता वाढवावी. . 

त्रस्त शेतकरी (कळंत्रेवाडी)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button