Blog

संभाव्य पूर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर निलेवाडी येथे आपत्ती व्यवस्थापनची प्रात्यक्षिके

संभाव्य पूर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर निलेवाडी येथे आपत्ती व्यवस्थापनची प्रात्यक्षिके

नवे पारगाव:निलेवाडी (ता.हातकणंगले) येथे भविष्यात संभाव्य महापुरसदृष परिस्थिती उद्भवल्यास उपाययोजना करताना अडचणी येऊ नये म्हणून गुरुवारी दुपारच्या सत्रात आपत्ती व्यवस्थापन अंतर्गत रबरी बोटीतून आपत्ती व्यवस्थापनची प्रात्यक्षिके घेण्यात आली. तसेच यावेळी सर्व जबाबदार अधिकाऱ्यांना योग्य त्या सूचना तहसीलदार यांनी दिल्या

      यावेळी हातकणंगलेच्या तहसीलदार श्रीमती कल्पना ढवळे, मंडळ अधिकारी अमित लाड, गावकामगार तलाठी शैलेश कुईंगडे, सरपंच माणिक घाटगे,उपसरपंच शहाजी बोरगे,निलेवाडी विकास सेवा सोसायटीचे चेअरमन सुभाष भापकर, ग्रामसेविका अनुपमा सिदनाळे, जीवनज्योत रेस्क्यू टीमचे सुनील जाधव,हनुमान कुलकर्णी,यश गिडवाणी,अमित शेळके व आधार फाउंडेशनचे सुरज मुरगुंडे,तेजश्री सासूने,मृणाली साठे,सागर पाटील आदींची उपस्थिती होती.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button