Blog
उंब्रजकरांवर धोक्याची टांगली तलवार कायम
उंब्रजकरांवर धोक्याची टांगली तलवार कायम
उंब्रज विभाग प्रतिनिधी/रघुनाथ थोरात
कराड तालुक्यातील उंब्रज गावचे हद्दीत भारत गॅस एजन्सी लगत पाटण पंढरपूर राज्य मार्गावर एक वाळलेले महाकाय झाड धोकादायक अवस्थेत आहे. जोरदार वाऱ्याच्या तडाख्यामुळे झाड कधीही कधीही कोसळण्याची शक्यता नाकारता येत नसून राज्यमार्गावर प्रवास करणारे दुचाकी, चारचाकी वाहनधारक तसेच येथून ये जा येणारे उंब्रजकर जेष्ठ नागरिकांवर धोक्याची टांगती तलवार कायम आहे. एखादी गंभीर दुर्घटना होऊन जिवितहानी झाल्यानंतरच प्रशासनास जाग येणार का? हा संतप्त सवाल उंब्रजकर विचारीत आहेत. त्यामुळे प्रशासनाने वेळीच सदरचे धोकादायक अवस्थेतील झाड काढून टाकावे अशी मागणी उंब्रजकर करीत आहेत.