माथेरानच्या रानमेव्याला पर्यटकांची पसंती
माथेरानच्या रानमेव्याला पर्यटकांची पसंती
सत्याचा शिलेदार वार्तापत्र प्रतिनिधी चंद्रकांत काळे रायगड माथेरान…
सह्याद्री पर्वतरांगांच्या कुशीत वसलेलं जगभरातील पर्यटकांच्या पसंतीचे प्रदूषण विरहित पर्यटक स्थळ माथेरान. वनराईने गर्द झाडी लाल माती व थंड हवामान येथील विशेष वैशिष्ट्ये . माथेरानच्या जंगलात एप्रिल मे आणि जून महिन्यात माथेरानच्या जंगलातील जांभूळ. करवंदे .आटके. जंगली कैरी. तोरणे. व सातेरी मध. अशी अनेक प्रकारची फळे माथेरानच्या जंगलात ठराविक ऋतूमध्येच आढळतात व ही फळे जंगलातून घेऊन डोंगरदर्यांच्या कड्या कपारीत राहणारे आदिवासी म्हणजेच ठाकर समाजाचे आदिवासी माथेरानला विक्रीसाठी घेऊन येतात .आपली उपजीविका चालवत असतात . या जंगलातील फळांची विशेष वैशिष्ट्य म्हणजे चविष्ट फळांसह औषधी असणारी ही फळे माथेरान च्या नागरिकांसह माथेरानला सहलीसाठी येणाऱ्या पर्यटकांच्या पसंतीची झालेली असून आदिवासी विक्रेत्यांना समाधानकारक व्यवसाय मिळतानाचे चित्र दिसून येत आहे….