Blog
संघर्ष कांबळे यास दहावी परीक्षेत ९१.८० टक्के
संघर्ष कांबळे यास दहावी परीक्षेत ९१.८० टक्के गुण प्राप्त
लोकराज्य जनता पार्टीचे कोल्हापूर जिल्हा कार्याध्यक्ष अमोल कांबळे यांचे चिरंजीव कु.संघर्ष अमोल कांबळे याला इयत्ता दहावीच्या बोर्ड परीक्षा ९१.८० टक्के गुण मिळवून प्राप्त झाले. संघर्ष हा वाघवे ता. पन्हाळा येथील योगी प्रभुनाथ हायस्कूल चा विद्यार्थी आहे. त्याचे वडील एक सामाजिक कार्यकर्ते असून त्याचबरोबर स्वतः प्लंबिंग चा व्यवसाय सुद्धा करतात. गरीब कुटुंबातून परिश्रम व जिद्द यांच्या जोरावर संघर्ष ने मिळवलेले हे यश निश्चितच कौतुकास्पद असे आहे. लोकराज्य जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष अनिल चव्हाण, जिल्हा अध्यक्ष पी के पाटील व सर्व कार्यकर्त्याकडून तसेच समाजातील विविध घटकातून संघर्षचे अभिनंदन करण्यात येत आहे.