कळंत्रेवाडीत महायुतीच्या बॅनरची अज्ञातांकडून मोडतोड
वातावरणात तणावपूर्ण शांतता
रघुनाथ थोरात
कळंत्रेवाडी,ता.कराड येथील रहिवासी तसेच भाजपचे कार्यकर्ते श्री राजेंद्र थोरात यांच्या राहत्या घराजवळील स्वमालकीच्या जागेमध्ये पाटण पंढरपूर राज्यमार्गालगत ग्रामपंचायतची रीतसर परवानगी घेऊन महायुतीचे कराड उत्तरचे अधिकृत उमेदवार श्री मनोज भिमराव घोरपडे यांच्या प्रचारार्थ लावण्यात आलेल्या बॅनरची सोमवार दिनांक ११ नोव्हेंबर रोजी मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञातांनी मोडतोड केल्याची दुर्दैवी घटना घडली. त्यामुळे गावामध्ये उलट सुलट चर्चांना उधाण आले असून वातावरणात तणावपूर्ण शांतता आहे. याबाबत घटनास्थळावरून मिळालेल्या अधिक माहितीनुसार, येथील रहिवासी तसेच भाजपचे कार्यकर्ते श्री राजेंद्र थोरात यांच्या स्वमालकीच्या जागेत महायुतीचे उमेदवार श्री मनोज भिमराव घोरपडे यांच्या प्रचारार्थ बॅनर लावण्यात आला होता. दरम्यान, सोमवार दिनांक ११ नोव्हेंबर रोजी मध्यरात्रीच्या सुमारास रात्रपाळीने पाणी पाजण्यासाठी शेतात जाणाऱ्या शेतकऱ्यांना सदर बॅनरची मोडतोड झाल्याचे निदर्शनास आले.दरम्यान,शेतकऱ्यांनी सदर घटनेची माहिती स्थानिक महायुतीच्या कार्यकर्त्यांना दिल्यानंतर त्या जागेवरून बॅनर हटवण्यात आला असून सदरची घटना अत्यंत निंदनीय व दुर्दैवी असल्याच्या प्रतिक्रिया यावेळी महायुतीच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केल्या.
सदरचे कृत्य अत्यंत निंदनीय व दुर्दैवी
अज्ञाताने केलेले सदरचे कृत्य हे अत्यंत निंदनीय व दुर्दैवी असून मनोज दादा घोरपडे विचार मंच व महायुतीच्या वतीने आम्ही त्याचा निषेध करतो…!
महायुती कार्यकर्ते (कळंत्रेवाडी)