सातारा जिल्हा
समर्थनगरमध्ये महिला मेळावा संपन्न
उंब्रज,ता.कराड येथील समर्थनगर येथे दिनांक 7 नोव्हेंबर रोजी भारतीय जनता पक्षाचे अधिकृत उमेदवार सन्माननीय मनोज दादा घोरपडे यांच्या प्रचारार्थ महिला मेळावा आयोजित करण्यात आला होता. सदर मेळाव्यास संग्राम बापू घोरपडे यांच्या पत्नी सौ तेजस्विनीताई घोरपडे यांची प्रमुख उपस्थिती होती. दरम्यान सदर मेळाव्यात माननीय श्री मनोज दादा घोरपडे यांना प्रचंड बहुमताने निवडून आणण्यासाठी उपस्थित महिलांनी एकजुटीने शपथ घेतली की, आमचा भावी आमदार मनोज दादाच असणार. यावेळी कामगार मोर्चा कराड उत्तर मंडल अध्यक्ष सन्माननीय मीनाक्षीताई पोळ, महिला मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष सन्माननीय प्रतिभा कांबळे, वैशालीताई मांढरे,स्नेहलताई, मनिषाताई व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.