सातारा जिल्हा

कराड हद्दीतील सूर्यवंशी मळ्यात बिबट्याचा वावर

नागरिक भितीच्या वातावरणाखाली

 

रघुनाथ थोरात

 

चरेगाव,ता.कराड हद्दीतील उत्तरमांड नदीकाठी वसलेल्या सूर्यवंशी मळा परिसरात बिबट्याचा वावर असून येथील नागरिक भितीच्या वातावरणाखाली वावरत आहेत. याबाबत मकरंद सूर्यवंशी यांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार, सूर्यवंशी मळ्यात असलेल्या त्यांच्या घराभोवती बिबट्याचा रात्री अपरात्री सतत वावर असतो. त्यांच्या घरासमोर गाईंचा गोठा आहे. अलीकडील काळात त्या गोठ्याच्या आसपास बिबट्याचा वावर वाढला आहे. त्यामुळे गोठ्यातील गाई अथवा लहान वासरे,शेळ्या-कोकरे आदींवर बिबट्याकडून हल्ला होण्याची शक्यता नाकारता येत नसल्यामुळे भविष्यात मोठी आर्थिक हानी होऊ शकते.आजपर्यंत सदर बिबट्याने शेतकऱ्यांच्या पाळीव कुत्र्यांवर हल्ले करीत बऱ्याच कुत्र्यांना ठार केले आहे. पाळीव कोंबड्या घराभोवतालीच्या झाडांवरती बसत असल्यामुळे बऱ्याच पाळीव कोंबड्यांचा फडशा बिबट्याने पाडलेला आहे.त्यामुळे आर्थिक नुकसानीस सामोरे जावे लागत आहे. त्याचबरोबर मकरंद सूर्यवंशी यांनी पाळलेल्या जवळपास आठ ते नऊ पाळीव कुत्र्यांना बिबट्याने ठार केल्याची माहिती यावेळी मकरंद सूर्यवंशी यांनी दिली. त्यामुळे या परिसरावर बिबट्याच्या दहशतीची असलेली टांगती तलवार केव्हा हटणार? सूर्यवंशी मळा परिसर बिबट्याच्या दहशतीतून केव्हा मुक्त होणार? या प्रश्नांची उत्तरे मिळणे सध्या तरी कठीण आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button