आज पासून चिकुर्डे येथे पारायण सोहळा व अखंड हरिनाम सप्ताह
चिकुर्डे तालुका वळवा येथे महादेव मंदिर श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा व अखंड हरिनाम सप्ताह गुरुवार तारीख 3/10/2024 ते बुधवार तारीख 9/10/2024 अखेर अ अखंड हरिनाम सप्ताह आयोजन केले असून महादेव मंदिरात घटस्थापनेच्या शुभ मुहूर्तावर गेले 45 वर्षे अखंड हरिनाम सप्ताह व श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा संपन्न होत आहे व्यासपीठ चालक ह भ प बाळू विभुते काकडा हरिपाठ साठी ह भ प प्रकाश कोळेकर महाराज मांगले ह भ प राजू वायदंडे बोरगाव रोकडे महाराज कोडोली यांच्या मार्गदर्शनाखाली सात दिवस पारायण सप्ताह होणार असून पहाटे पाच ते सहा काकड आरती आठ ते 11 ज्ञानेश्वरी वाचन सायंकाळी पाच वाजता नाताचे अभंग सात ते आठ प्रवचन व रात्री नऊ ते 11 कीर्तन असे कार्यक्रम होणार असून नामांकित प्रवचनकार व कीर्तनकार यांची कीर्तने होणार आहेत तरी याचा लाभ परिसरातील वारकरी भजनी मंडळ व लोकांनी घ्यावा अशी आवाहन संयोजकांनी केले आहे बाहेरगावाहून येणाऱ्या वारकऱ्यांची व भजन मंडळाची राहण्याची जेवणाची सोय केलेली आहे याचा लाभ सर्वांनी घ्यावा