बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी चकमकीत ठार
बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपीला आज चकमकीत ठार करण्यात आले. प्राथमिक माहितीनुसार, तळोजा कारागृहातून बदलापूरला तपासासाठी नेत असताना अक्षय शिंदे नावाच्या २३ वर्षीय रखवालदाराने पोलिस कर्मचाऱ्याचे पिस्तूल हिसकावले आणि एका पोलिस अधिकाऱ्यावर गोळी झाडली. पोलिसांच्या ताब्यातून पळून जाण्याचा प्रयत्न करत असताना प्रत्युत्तरादाखल केलेल्या गोळीबारात तो ठार झाला. शिंदे यांना गेल्या महिन्यात शाळेच्या आवारात दोन अल्पवयीन मुलांवर अत्याचार केल्याप्रकरणी अटक करण्यात आली होती. राज्य सरकारने विशेष तपास पथकाची स्थापना केली होती, ज्याने गेल्या आठवड्यात दोन स्वतंत्र आरोपपत्र दाखल केले होते. मुंबईत पत्रकारांशी बोलताना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले की, आरोपीला पोलीस अधिकाऱ्यांनी स्वसंरक्षणार्थ ठार मारले. या घटनेत सहाय्यक पोलीस निरीक्षक नीलेश मोरे हे देखील जखमी झाल्याचे त्यांनी सांगितले.