क्राईम
पूर्ववैमनस्त्यातून टिंबर मार्केट इथल्या तरुणाचा थरारक पाठलाग करून धारदार शस्त्रानं खून
पूर्ववैमनस्त्यातून टिंबर मार्केट इथल्या तरुणाचा थरारक पाठलाग करून धारदार शस्त्रानं खून
प्रतिनिधी : रोहन भिऊंगडे
कोल्हापूर,पूर्ववैमनस्त्यातून टिंबर मार्केट इथल्या पाटीदार भवन परिसरात थरारक पाठलाग करून धारदार शस्त्रानं वार करीत एका तरुणाचा खून करण्यात आला आहे. सुजल बाबासो कांबळे असे त्या तरुणाचे नाव असून तो वारे वसाहत परिसरात राहणारा आहे. घटनास्थळी शहर पोलीस उपाधीक्षक अजित टिके, जुना राजवाडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजीवकुमार झाडे पोलीस फौज फाट्यासह दाखल झाले असून पोलिसांकडून पंचनामा करण्याचे काम सुरू आहे.
सुजल याचा मृतदेह उत्तरीय तपासनीसाठी सीपीआर इथं आणला असून या ठिकाणी सुजलचे नातेवाईक आणि मित्रपरिवार यांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे. याठिकाणी देखील पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.