ताज्या बातम्याराजकीय
सुनेत्रा पवार राज्यसभेवर बिनविरोध
सुनेत्रा पवार राज्यसभेवर बिनविरोध
कुणाचाही अर्ज न आल्याने सुनेत्रा पवार यांची राज्यसभेवर बिनविरोध निवड झाली आहे.मात्र अर्ज दाखल करतेवेळी महायुतीचे नेते नसल्याने युतीत मतभेद असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होती.
ऑर्गनायझर ‘ मध्ये संघाने महाराष्ट्रातील पराभवास राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट जबाबदार असल्याचा आरोप केल्याने, याचे पडसाद आजच्या घटनेवर पडले होते
परंतू नेहमीप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि भाजपच्या नेत्यांनी याचा इन्कार केला.
लोकसभा निवडणुकीनंतर आठच दिवसात सुनेत्रा पवार यांची राज्यसभेवर निवड झाली खरी, पण पक्षात अनेक नेते इच्छूक असल्याने राष्ट्रवादीत वैचारिक दरी निर्माण झाली आहे.