पशुहत्या रोखण्यासाठी योग्य ती कारवाई करावी :हिंदुत्ववादी संघटनांच्या
पशुहत्या रोखण्यासाठी योग्य ती कारवाई करावी, अन्यथा अन्यथा विशाळगडावर जाऊन सकल हिंदू समाज संबंधितांचा समाचार घेणार – हिंदुत्ववादी संघटनां आक्रमक
प्रतिनिधी : रोहन भिऊंगडे
कोल्हापूर,शाहूवाडी तालुक्यातील विशाळगडावर गेल्या अनेक वर्षापासून प्रचंड मोठ्या प्रमाणात पशुहत्या होतायत. या विरोधात सकल हिंदू समाज आणि हिंदुत्ववादी संघटनांनी आवाज उठवून त्यावर बंदी घालण्याची मागणी केली होती. त्यानंतर प्रशासनानं या विषयाचं गांभीर्य लक्षात घेऊन विशाळगडावर प्राणी आणि पशु आणण्यास आणि त्यांची कत्तल करण्यास बंदी केली होती. मात्र, अजून विशाळगडावर पशुहत्या होतायत. पशुहत्या करणाऱ्यांच्या पाठीशी राजकीय आणि स्थानिकांचा वरदहस्त आहे का ? याबाबत चौकशी होवून दोषींवर कारवाई करावी अशी मागणी सकल हिंदू समाज आणि हिंदुत्ववादी संघटनांनी केली. पशुहत्या रोखण्यासाठी योग्य ती कारवाई करावी, अन्यथा अन्यथा विशाळगडावर जाऊन सकल हिंदू समाज संबंधितांचा समाचार घेईल असा इशारा हिंदुत्ववादी संघटनांच्या प्रतिनिधींनी पोलीस प्रशासनाला निवेदनात दिला.
यावेळी संभाजी साळुंखे, आशिष पवार, अनिल चोरगे, प्रशांत कागले, सोनू विश्वकर्मा, योगेश शेटके, मनोहर सोरप यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.