फिर एक बार मोदी सरकार ;गांधीनगरमध्ये एकच जल्लोष
गांधीनगर येथे भाजप महिला आघाडीच्या वतीने नरेंद्र मोदी सरकारच्या शपथविधीनंतर साखर पेढे व मिठाईवाटप करून आनंदोत्सव साजरा करताना महिला कार्यकर्त्या
फिर एक बार मोदी सरकार ;गांधीनगरमध्ये एकच जल्लोष
साखर-पेढे, मिठाईवाटप
गांधीनगर : प्रतिनिधी : गजानन रानगे
श्री.नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान पदाची तिसऱ्यांदा शपथ घेतल्यानंतर साऱ्या गांधीनगरमध्ये एकच जल्लोष झाला. कोल्हापूर दक्षिण भाजप महिला मोर्चाच्या (ग्रामीण) अध्यक्षा व माजी सरपंच पुनम परमानंदानी, तालुका उपाध्यक्ष माया चुगलानी, सरचिटणीस कंचन नागदेव, गांधीनगर शाखा अध्यक्ष रक्षा अडवाणी यांनी भाजप प्रणित महायुती सरकार सलग तिसऱ्यांदा सत्तेवर आल्याबद्दल अभिनंदनपर मनोगत व्यक्त करून साखर पेढे व मिठाईचे वाटप करण्यात आले. पुनम सेवालानी, वनिता खत्री, शोभा चिमने, दया खियानी व महिला मोर्चाच्या कार्यकारणी सदस्यांनी नरेंद्र मोदींच्या जयघोशात आनंदोत्सव साजरा केला.
शिवसेनेचे एकनाथ शिंदे गटाचे गांधीनगर प्रमुख यांनीही महायुतीच्या शपथविधी सोहळ्याबद्दल ठिकठिकाणी, चौका चौकामध्ये मिठाई, साखर पेढे वाटून नरेंद्र मोदी यांच्या सरकारला शुभेच्छा दिल्या.
गडमुडशिंगीमध्ये आनंदोत्सव
गडमुडशिंगी : गडमुडशिंगी येथेही मोदी सरकारच्या तिसऱ्यांदा झालेल्या शपथविधी बद्दल आनंदोत्सव साजरा करण्यात आला. छत्रपती राजाराम साखर कारखान्याचे संचालक तानाजी पाटील व त्यांच्या सहकारी कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणा देत एकच जल्लोष केला. भाजपच्या गडमुडशिंगी शाखाप्रमुख नूरजहान शेख, भाजप महिला मोर्चा तालुका उपाध्यक्ष जान्हवी विनोद वलेचा, सरपंच संदीप पाटोळे, गांधीनगर ग्रामपंचायत सदस्य गजेंद्र हेगडे यांनी नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळाला शुभेच्छा देत ग्रामस्थांना व कार्यकर्त्यांना साखर पेढे व मिठाईचे वाटप केले.
वळीवडेमध्ये कार्यकर्त्यांचा जल्लोष
वळीवडे : भाजप महिला मोर्चाच्या उपाध्यक्ष सुलोचना नार्वेकर यांच्या नेतृत्वाखाली भाजप महिला कार्यकारिणी सदस्यांनी वळीवडे येथे नरेंद्र मोदी यांची पंतप्रधानपदी तिसऱ्यांदा निवड झाल्याबद्दल व महायुतीच्या नूतन सरकारला शुभेच्छा देत आनंदोत्सव साजरा केला. चौकाचौकामध्ये, घरोघरी साखर पेढे व मिठाईचे वाटप करून एकच जल्लोष केला. सर्वसामान्यांची सेवा करण्याची शपथ यावेळी महिला कार्यकर्त्यांनी घेतली.